बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार; एक गंभीर
By admin | Published: January 10, 2017 02:43 AM2017-01-10T02:43:44+5:302017-01-10T02:43:44+5:30
येथील टेमकर मळ््यातील शेतकरी राजाराम भागूजी टेमकर यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने सोमवारी पहाटे साडेतीनच्या
निरगुडसर : येथील टेमकर मळ््यातील शेतकरी राजाराम भागूजी टेमकर यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हल्ला क रून एका शेळीला जागेवरच ठार मारले़, तर दुसरीला गंभीर जखमी केले.
टेमकर यांच्या घराशेजारी असणाऱ्या शेळ्यांच्या गोठ्यात एकूण ५ शेळ्या बांधलेल्या होत्या. गोठ्याच्या भिंतीवरून उडी मारून बिबट्याने आत प्रवेश केला व शेळ्यांवर हल्ला केला़ पहाटे साडेतीनच्या सुमारास कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्याने टेमकर कुटुंबीयांना जाग आली, तेव्हा त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता, दोन शेळ्या जखमी अवस्थेत आढळून आल्या़ त्यानंतर त्यांनी बॅटरी लावून आजूबाजूला पाहिले असता जवळील शेतात बिबट्या शिरताना त्यांना दिसला़ जखमी शेळीवर डॉ़ सुरेश टाव्हरे यांनी उपचार केले़ जखमी शेळीच्या गळ्याला चावा घेतल्यामुळे शेळीची अवस्था गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले़ मागील आठवड्यात विजय मेंगडे यांच्या शेळीला बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते़यामुळे शेतकरी टेमकर यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाने त्याची नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे़ वनपाल मंगेश गाडे व वनरक्षक एस.आऱ पाटील, शरद जाधव, संपत भोर, दशरथ मेंगडे यांनी पंचनामा केला.