'आई-वडिलांच्या सांभाळातच खरा देव'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 02:07 AM2019-01-30T02:07:33+5:302019-01-30T02:08:04+5:30

आई-वडिलांच्या सांभाळातच खरे देव असून माणसाला आशीर्वाद मिळत असल्याचे मत प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्तीमहाराज देशमुख यांनी व्यक्त केले. ​​​​​​

'God in the care of the parents' | 'आई-वडिलांच्या सांभाळातच खरा देव'

'आई-वडिलांच्या सांभाळातच खरा देव'

Next

कोरेगाव भीमा : माणूस सुखी आयुष्य जगण्यासाठी व सुखी राहण्यासाठी देवाचे दर्शन घेण्यासाठी धडपडत असतो, परंतु खरा देव म्हणजे आई वडील असतात व आई-वडिलांच्या सांभाळातच खरे देव असून माणसाला आशीर्वाद मिळत असल्याचे मत प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्तीमहाराज देशमुख यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शिक्रापूरचे उपसरपंच व शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे-पाटील यांचे वडील व जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांचे सासरे शामराव दिनकर मांढरे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुजाता पवार, राजेंद्र जगदाळे, स्वाती पाचुंदकर, रोहिणी सासवडे, काकासाहेब पलांडे, शशिकांत दसगुडे, विश्वास ढमढेरे, रवींद्र काळे, वैभव यादव, कैलास नरके, नवनाथ कांबळे, सुभाष उमाप, मोनिका हरगुडे, विकास शिवले, बाबासाहेब सासवडे, शंकर जांभळकर, जयश्री भुजबळ, आबासाहेब करंजे, संजय जगताप, नीलेश थोरात, संतोष भुजबळ, जयश्री दोरगे, गौरव करंजे उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘‘जीवन जगत असताना आई-वडिलांचा आशीर्वाद गरजेचा असून मुलांनी नेहमी आई वडिलांची मान अभिमानाने उंचावेल, या पद्धतीत वागून आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले पाहिजे,’’ असे सांगत मोबाईलच्या अतिवापराचे होत असलेले परिणामदेखील ह.भ.प. निवृत्तीमहाराज देशमुख यांनी सांगितले. यावेळी मनोगत व्यक्त करताना अनेकांनी मांढरे कुटुंबीयांचे असलेले समाजोपयोगी कार्यदेखील कौतुकास्पद असल्याचे मत बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी व्यक्त केले. पार्थ नाणेकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र मांढरे यांनी आभार मानले.

Web Title: 'God in the care of the parents'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.