गोडाऊन आगप्रकरणी व्यावसायिकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:13 AM2021-08-12T04:13:12+5:302021-08-12T04:13:12+5:30
पुणे : शॉर्टसर्किटमुळे गोडाऊनमध्ये साठवलेल्या ज्वलनशील थिनरला आग लागून कामगाराचा मृत्यू झाला. या आगीत थिनरचे दहा बॅरल व गोडाऊनचे ...
पुणे : शॉर्टसर्किटमुळे गोडाऊनमध्ये साठवलेल्या ज्वलनशील थिनरला आग लागून कामगाराचा मृत्यू झाला. या आगीत थिनरचे दहा बॅरल व गोडाऊनचे ४ लाख ५० हजार रुपये तसेच गोडाऊन समोर लावलेल्या दोन ट्रॅव्हल बस जळून सुमारे साडे एकोणतीस लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी व्यावसायिकावर उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रिजेश सहानी (वय २०) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदाराने फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी (दि.७) रात्री १०.३० वाजता न्यू कोपरे गाव येथील गोडाऊन येथे घडली. आरोपीने शुभम सेल्स अँड केमिकल नावाने व्यवसाय सुरू केला होता. भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोडाऊनमध्ये त्याने ज्वलनशील थिनरच्या १० बॅरलचा साठा केला होता. मनुष्य जीविताच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपायोजना केली नाही. पोलीस उपनिरीक्षक माने पुढील तपास करीत आहेत.