Video: बारामती एमआयडिसीत शॉटसर्किटमुळे गोडाऊनला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 14:30 IST2023-11-27T14:27:29+5:302023-11-27T14:30:25+5:30
गोडाऊन मध्ये चॉकलेट कुरकुरे बिस्किट यांचे एक्सपायर झालेले पाऊच साठवण्यात येत होते

Video: बारामती एमआयडिसीत शॉटसर्किटमुळे गोडाऊनला भीषण आग
बारामती : बारामती एमआयडीसी परिसरात मध्यरात्री एका गोडाऊनला आग लागल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या आगीत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे गोडाऊनला आग लागली ची प्राथमिक माहिती समजते.
बारामती एमआयडीसीत परिसरात दिलीप माने यांच्या मालकीच्या हे १५ हजार स्क्वेअरफिट गोडाऊन आहे. या गोडाऊन मध्ये चॉकलेट कुरकुरे बिस्किट यांचे एक्सपायर झालेले पाऊच साठवण्यात येत होते,अशी माहिती मिळत आहे. सोमवारी मध्यरात्री या गोडाऊन मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच बारामती नगरपालिका आणि एमआयडीसी परिसरातील अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्लास्टिक वेस्टन मुळे आगीची तीव्रता वाढली.सध्या आग आटोक्यात आली आहे.
बारामती MIDC मध्ये गोडाऊनला भीषण आग #Pune#baramati#firepic.twitter.com/ZAjBlAmmIh
— Lokmat (@lokmat) November 27, 2023