माघी गणेशोत्सवानिमित्त कसबा गणपती मंदिरात ‘गोफ सुरांचा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 03:42 PM2018-01-24T15:42:47+5:302018-01-24T15:46:04+5:30

कसबा गणपती मंदिरात माघी गणपती उत्सवानिमित्त ‘गोफ सुरांचाऽ हा अत्यंत बहारदार कार्यक्रम झाला. यामध्ये डॉ.राजश्री महाजनी, जया जोग, डॉ. नीलिमा राडकर यांनी गायन व सतार-व्हायोलिनच्या वादनाचा एकत्रित स्वराविष्कार करून रसिकांची दाद मिळवली.

'Gof Surancha' at Kasba Ganapati Temple for Maghi Ganeshotsav | माघी गणेशोत्सवानिमित्त कसबा गणपती मंदिरात ‘गोफ सुरांचा’

माघी गणेशोत्सवानिमित्त कसबा गणपती मंदिरात ‘गोफ सुरांचा’

Next
ठळक मुद्देझाला बागेश्री रागातून सुरेख स्वरमेळ, गायन-वादनाचा रंगतदार मिलाफ गायन व सतार-व्हायोलिनच्या वादनाचा एकत्रित स्वराविष्कार

पुणे : कसबा गणपती मंदिरात माघी गणपती उत्सवानिमित्त ‘गोफ सुरांचाऽ हा अत्यंत बहारदार कार्यक्रम झाला. यामध्ये डॉ. राजश्री महाजनी, जया जोग, डॉ. नीलिमा राडकर यांनी गायन व सतार-व्हायोलिनच्या वादनाचा एकत्रित स्वराविष्कार करून रसिकांची दाद मिळवली.
सुरुवातीला बागेश्री रागातून सुरेख स्वरमेळ सुरू झाला व गायन-वादनाचा रंगतदार मिलाफ झाला. दुर्गा रागाची उत्तम मांडणी, सहा भाषांचा मेळ असलेले गणपतीगीत यातून भाषा, संस्कृती, शैली यांचाही जणू गोफ विणला. भैरवीने कार्यक्रमाची उंची गाठली. विभिन्न बाज, सादरीकरण, विचार यात फरक असूनही गायन-वादनाची सुंदर गुंफण होऊन सुश्राव्य मैफलीची मेजवानी रसिकांनी अनुभवली.
उपेंद्र सहस्त्रबुद्धे (हार्मोनियम), राजगोपाल गोसावी (तबला) यांनी सुरेख साथसंगत केली. यावेळी मुख्य विश्वस्त विनायक उर्फ धनंजय ठकार, माजी मुख्य विश्वस्त संगीता ठाकर, मंदा तावरे,अनघा इनामदार,अशोक केमकर आदी उपस्थित होते.

Web Title: 'Gof Surancha' at Kasba Ganapati Temple for Maghi Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे