विमानतळावर पकडले सव्वा कोटीचे सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:33 AM2017-08-19T01:33:51+5:302017-08-19T01:34:45+5:30
केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम्स) अधिकाºयांनी लोहगाव विमानतळावर तस्करीचे तब्बल एक कोटी ३८ लाख रुपयांचे साडेचार किलो सोने पकडले.
पुणे : केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम्स) अधिका-यांनी लोहगाव विमानतळावर तस्करीचे तब्बल एक कोटी ३८ लाख रुपयांचे साडेचार किलो सोने पकडले. सोन्याची बिस्किटे, सोन्याच्या तारांचा समावेश आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून हे सोने आखाती देशातून आणले होते.
रफतजहान शौकत अली, आसिफ खान, मोहम्मद अश्फाक मोहम्मद कासीम, हुसेन सय्यद अहमद (चौघे रा. मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अबुधाबीवरून जेट एअरवेजचे विमान आले होते. उतरल्यानंतर गडबडीत जात असताना त्यांच्याबाबत अधिका-यांना संशय आला. बॅगेमध्ये -होडियम नावाच्या धातूच्या आवरणामध्ये सोन्याच्या तारा, सोन्याची बिस्किटे लपवून आणल्याचे समोर आले. डेप्युटी कमांडंट भरत नवले, असिस्टंट कमांडंट मनीष दुडपुरी यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती उपायुक्त महेश पाटील यांनी दिली.