तब्येत बरी नसतानाही ८ दिवसाच्या सरावात 'गोल्ड' मेडल; पुण्याच्या तृप्तीची कौतुकास्पद कामगिरी
By श्रीकिशन काळे | Published: October 25, 2024 05:18 PM2024-10-25T17:18:22+5:302024-10-25T17:20:02+5:30
खरंतर ही स्पर्धा होण्यापूर्वी तृप्तीची तब्येत बरी नव्हती, तरी देखील त्यावर मात करत तिने ८ दिवसांचा सराव करून या स्पर्धेत सहभाग घेत गोल्ड मिळवले
पुणे : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्वीमिंग चॅम्पियनशिप जलतरण दिव्यांग स्पर्धेमध्ये पुण्याच्या तृप्ती चोरडियाने गोल्ड मेडल पटकाविले. तिने यापूर्वी देखील अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिके मिळविली आहेत. केवळ आठ दिवसांमध्ये सराव करून तब्येत बरी नसताना तिने हे यश मिळविले आहे.
गेल्या काही वर्षांपासून तृप्ती ही स्वीमिंगमध्ये आपला सहभाग नोंदवत आहे. ती सध्या कामगार कल्याण केंद्र स्वीमिंग पूल, सहकारनगर येथे सराव करत आहे. नुकतेच गोव्यामध्ये ऑलिम्पिक स्वीमिंग पुल, कॅम्पल, पणजी येथे २४ व्या राष्ट्रीय स्वीमिंग चॅम्पियनशिप जलतरण स्पर्धा झाल्या. त्यात दिव्यांग जलतरणपटू तृप्ती दिलीप चोरडिया हिने ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये गोल्ड मेडल, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक सिल्व्हर मेडल, ५० मीटर बॅक स्ट्रोक 4th प्लेस मिळविले. त्यामुळे तिचा सर्वत्र सन्मान होत आहे. नंदकिशोर इंदलकर यांनी तिला मार्गदर्शन केले.
खरंतर ही स्पर्धा होण्यापूर्वी तृप्तीची तब्येत बरी नव्हती. तरी देखील त्यावर मात करत तिने केवळ आठ दिवसांचा सराव करून या स्पर्धेत सहभाग घेतला. तसेच गोल्ड मेडल देखील मिळविले.