‘ज्ञानसागर’मधील बहीणभावाचे राज्यस्तरीय सांबो स्पर्धेत सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:10 AM2021-02-14T04:10:47+5:302021-02-14T04:10:47+5:30
दि. ६ व ७ फेब्रुवारीदरम्यान चौथ्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धा चंद्रशेखर आगाशे कॉलेज गुलटेकडी (पुणे) येथे पार पडल्या. या स्पर्धेचे ...
दि. ६ व ७ फेब्रुवारीदरम्यान चौथ्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धा चंद्रशेखर आगाशे कॉलेज गुलटेकडी (पुणे) येथे पार पडल्या. या स्पर्धेचे आयोजक पुणे जिल्हा ज्युदो असोसिएशन अध्यक्ष संतोष चोरमले होते. प्रमुख पाहुणे सांबो फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव राम शर्मा, गोल्डन गाईज सनी वाघचौरे होते. तसेच ज्युदो ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष अॅड. स्मिता निकम याही उपस्थित होत्या.
या स्पर्धेमध्ये ज्ञानसागर गुरुकुलमधील आर्या समीर कांबळे (इ. तिसरी) प्रथम (गोल्ड मेडल), अथर्व समीर कांबळे (इ. ७ वी) प्रथम (गोल्ड मेडल) मिळवून राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली. या दोन्ही स्पर्धकांची निवड पंजाब (रोहतक) येथे होणाऱ्याºराष्ट्रीय सांबो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे यांनी केले .
या वेळी संस्थेच्या आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे, कार्याध्यक्षा प्रियांका, डायरेक्टर अलका आटोळे, डायरेक्टर पल्लवी सांगळे, डायरेक्टर दीपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभागप्रमुख गोरख वनवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे, नीलिमा देवकाते आदी उपस्थित होते.
—————————————
———————————————
फोटो
१२ बारामती २७