'गोल्ड मेडल' विजेता नीरज चोप्राचं गौरव; पुण्यातील आर्मी स्टेडियमला दिलं नाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 07:52 PM2021-08-27T19:52:40+5:302021-08-27T19:53:10+5:30

एका सैनिकात खरा खेळाडू दडलेला असतो. तर सच्च्या खेळाडूमध्ये एक सैनिक कायम असतो.

Gold Medal winner Neeraj Chopra's glory; Name given to the Army Stadium in Pune | 'गोल्ड मेडल' विजेता नीरज चोप्राचं गौरव; पुण्यातील आर्मी स्टेडियमला दिलं नाव 

'गोल्ड मेडल' विजेता नीरज चोप्राचं गौरव; पुण्यातील आर्मी स्टेडियमला दिलं नाव 

googlenewsNext

पुणे : भारतीय क्रीडा इतिहासात मेजर ध्यानचंद, कॅप्टन मिल्खा सिंग, कर्नल राजवर्धनसिंह राठोड, कॅप्टन विजयकुमार यांच्या परंपरेत आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत सुभेदार नीरज चोप्राचंही नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं आहे, असे कौतुकोद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चोप्रा यांच्याबद्दल काढले. तसेच पुण्यातील आर्मी स्टेडियमला सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचं यांचे नाव दिल्याची घोषणा देखील केली आहे. 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुण्यात सैन्यातील ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी नाईक सुभेदार दीपक पुनिया यांचा विशेष पदक देत सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याचवेळी नाईक अर्जुनलाल जाट, नाईक सुभेदार विष्णू सर्वनंद, महाराष्ट्रातील नाईक सुभेदार अविनाश सावळे यांनाही यावेळी सन्मान केला गेला. भारतीय सैन्यातील २३ खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या सर्व खेळाडूंचं राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केलं. 

राजनाथ सिंह म्हणाले, खेळ माणसाला फक्त शारिरिक नाही तर सामाजिक, व्यावहारिक, भावनात्मक आणि मानसिक रुपानेही सुदृढ बनवतो. यामुळे माझं मत आहे की एका सैनिकात खरा खेळाडू दडलेला असतो. तर सच्च्या खेळाडूमध्ये एक सैनिक कायम असतो, असंही राजनाथ सिंह म्हणाले. सैन्यदलाच्या स्टेडियमनला नीरज चोप्राचं नाव देणे ही छोटी गोष्ट नाही. हा देशवासियांकडून करण्यात आलेला सन्मान आहे, असं सिंह यावेळी म्हणाले. 

नायब सुभेदार दीपक पुनिया आपल्या कांस्य पदकापासून काही अंतरावरुन चुकले, मात्र त्यांचं प्रदर्शन प्रशंसनीय होतं. त्यासह सुभेदार ओरोकिया राजीव यांचं 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये नवं आशियाई रेकॉर्ड बनवण्याचं प्रदर्शन कौतुकास पात्र आहे, असंही राजनाथ सिंह म्हणाले. 

एएसआय, भारतीय सेना एक अद्वितीय आणि जागरिक स्तरावरील क्रीडा संस्था आहे. भारत सरकारकडून गेल्या काही वर्षात क्रीडा स्पर्धांमध्ये क्वालिटी वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत. ही फक्त सरकारी स्किम नाही, तर एक आंदोलन आहे. ज्याला आपल्याला अजून पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला या प्रयत्नातून यश आणि नवे आयाम गाठायचे आहेत. तसेच आतापर्यंत ३४ ऑलिम्पिक,२२ कॉमनवेल्थ गेम्सची पदकं जिंकली आहेत. २१ एशियन गेम्स, ६ युथ ऑलिम्पिक, १३ अर्जुन पुरस्कार विजेता दिले आहेत असेही सिंह यावेळी म्हणाले. 

Web Title: Gold Medal winner Neeraj Chopra's glory; Name given to the Army Stadium in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.