ताहीर, इद्रिस, सकीना यामिनी यांना सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:15 AM2021-02-18T04:15:44+5:302021-02-18T04:15:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुलमर्ग, जम्मू-काश्मीर येथे स्की अँड स्नोबोर्ड संघटना (महाराष्ट्र) यांच्या वतीने आयोजित पहिल्या स्की अँड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुलमर्ग, जम्मू-काश्मीर येथे स्की अँड स्नोबोर्ड संघटना (महाराष्ट्र) यांच्या वतीने आयोजित पहिल्या स्की अँड स्नोबोर्ड राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या ताहीर शबीर, इद्रिस हुसामुद्दीन, सकीना यामिनी आणि सकीना कसींजी या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावत सुवर्णपदक पटकावले.
कुमार गटाच्या स्पर्धेत १० जिल्ह्यांतून ६० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा अल्पाइन स्लॅलोम व जायंट स्लॅलोम ४०० मीटर अंतरावरील होती. यात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात मुंबईच्या इद्रिस हुसामुद्दीनने प्रथम क्रमांक पटकावला. मुंबईच्या हुस्सेन सिराजने दुसरा व पुण्याच्या शार्दूल कुऱ्हे व अमेय दांगट यांनी तिसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात मुंबईच्या सकीना यामिनी हिने पहिला व पुण्याच्या काम्या कार्तिकन हिने दुसरा क्रमांक पटकावला.
सोळा वर्षांखालील मुलांच्या गटात मुंबईच्या ताहीर शबीरने प्रथम क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात सकीना कसींजीने अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्की अँड स्नोबोर्ड संघटनेचे अध्यक्ष आनंद लाहोटी, सचिव साबीर शेख, खजिनदार प्रदीप राठोड, डॉ. ए. दयानंद कुमार, डॉ. प्रदीप खांडरे आणि कालिदास मगर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेतील पुण्यातील विजेते :
१४ वर्षांखालील मुले :
कांस्य - शार्दूल कुऱ्हे व अमेय दांगट
१४ वर्षांखालील मुली :
रजत - काम्या कार्तिकन
१६ वर्षांखालील मुले :
कांस्य - कृष्णा परदेशी/आर्यन कुऱ्हे
१६ वर्षांखालील मुली :
कास्य - रिद्धी राठी/आस्था लाहोटी