सोन्याच्या मोहापायी २ लाखांना लुबाडले
By admin | Published: May 5, 2015 03:02 AM2015-05-05T03:02:14+5:302015-05-05T03:02:14+5:30
सोनवडी (ता. दौंड) परिसरात कमी किमतीत सोने देतो, म्हणून मुंबई येथील गौरव ताटी या व्यक्तीला मारहाण करुन रोख रक्कम व सोन्याच्या वस्तुंसह १ लाख ८८ हजार
दौंड : सोनवडी (ता. दौंड) परिसरात कमी किमतीत सोने देतो, म्हणून मुंबई येथील गौरव ताटी या व्यक्तीला मारहाण करुन रोख रक्कम व सोन्याच्या वस्तुंसह १ लाख ८८ हजार रुपयांना लुबाडण्यात आले़ या प्रकरणी इस्टप शिंदे (वय २५), निभरी भोसले (वय ३५, दोघेही रा. बोरावके नगर, दौंड), बाबा भोसले (वय २५), करिना भोसले (वय २0, दोघेही रा. गोपाळवाडी, दौंड) या चौघांना मुंबई येथे अटक करण्यात आली आहे. आरोपींनी ज्या प्रकारे ताटींना फसविले, तशाच प्रकारे त्यांना सापळ्यात अडकवून पकडण्यात आले़
याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक दिनेश कुलकर्णी यांनी दिली. गौरव ताटी हे पंढरपुरच्या विठोबाचे दर्शन घेऊन रेल्वेने मुंबईला येत असतांना इस्टप शिंदे आणि गौरव ताटी यांची प्रवासात ओळख झाली. यावेळी इस्टप गौरवला म्हणाला की माझ्या आजीचे १0 तोळे सोने आहे. तेव्हा १0 हजार रुपये तोळा या प्रमाणे सोने विकायचे आहे. तर तुम्ही सोने घ्याल का असे सांगुन दोघांनीही एकमेकाचे मोबाईल नंबर घेतले़ दोघांनीही संपर्क साधल्याने १७ एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गौरव ताटी यांना आरोपींनी दौंड रेल्वे स्थानकातून सोनवडी परिसरात अज्ञात ठिकाणी आणले. तेव्हा या ठिकाणी अन्य चौघांनी गौरव यांना म्हणाले पैसे द्या आम्ही तुम्हाला सोने देतो असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. घाबरुन गौरव हे कोणाला काही न सांगता थेट
मुंबईला गेले़ (वार्ताहर)