सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो वजनाची सोन्याची साडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 10:35 AM2021-10-15T10:35:38+5:302021-10-15T10:36:00+5:30

श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे ११ वे वर्ष आहे. दस-याच्या दिवशी हळदी-कुंकू व ओटीच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाचा समारोप झाला.

A gold sari weighing 16 kg to Shri Mahalakshmi Devi in front of Sarasbage | सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो वजनाची सोन्याची साडी

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो वजनाची सोन्याची साडी

googlenewsNext

पुणे - दस-यानिमित्त सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे १६ किलो वजनाची ही साडी आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी गर्दी केली.
 
श्री महालक्ष्मी मंदिर, बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी ही साडी नेसविण्यात येते. दक्षिण भारतातील कारागिरांनी १० वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली. श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे ११ वे वर्ष आहे. दस-याच्या दिवशी हळदी-कुंकू व ओटीच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाचा समारोप झाला.  

अमिता अग्रवाल म्हणाल्या, नवरात्र उत्सवात यंदा धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारे नानाविध उपक्रम राबविण्यात आले. उत्सवात सुक्त अभिषेक, श्री महालक्ष्मी महायाग, श्री दुर्गासप्तशती महायाग, सुप्रभातम् अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये झाले. धार्मिक कार्यक्रमांसोबतच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, लस देणा-या सेवकांचा गौरव, कोविड काळात पालकत्व हरपलेल्या व देवदासिंच्या कन्यांचे पूजन, सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान, पोलीस खात्यातील महिलांचा गौरव असे सामाजिक कार्यक्रम देखील मंदिरात आयोजित करण्यात आले होते.

Web Title: A gold sari weighing 16 kg to Shri Mahalakshmi Devi in front of Sarasbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.