प्लॅस्टिकच्या जयपुरी बांगड्यांतून सोन्याची तस्करी; लोहगाव विमानतळावर मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 07:10 PM2018-02-07T19:10:31+5:302018-02-07T19:15:29+5:30
दोन वेगवेगळ्या विमानातून आलेल्या मुंबईच्या दोन बहिणीने प्लॅस्टिकच्या जयपुरी बांगड्यांतून ६९९ ग्रॅम सोने व २ किलो केशर तस्करी करून आणताना लोहगाव विमानतळावर पकडण्यात आले.
पुणे : दोन वेगवेगळ्या विमानातून आलेल्या मुंबईच्या दोन बहिणीने प्लॅस्टिकच्या जयपुरी बांगड्यांतून ६९९ ग्रॅम सोने व २ किलो केशर तस्करी करून आणताना लोहगाव विमानतळावर पकडण्यात आले.
त्याची किंमत २१ लाख ७६ हजार ५०२ रुपये आहे. शेख निखत झैनुद्दीन आणि रोमाना झुबेर शेख अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले, की या दोन्ही बहिणी वेगवेगळ्या विमानाने आज आल्या. त्यांच्या सामानाची तपासणी झाली. त्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करताना त्यांना हातातील बांगड्या जड लागल्या. तेव्हा त्या तपासल्या असता त्याच्या आत २४ कॅरेटचे सोने आढळून आले. दोघींकडे प्रत्येकी ४ बांगड्या होत्या. त्यात एकूण ६९९ ग्रॅम सोने व २ किलो केशर असा २१ लाख ७६ हजार ५०२ रुपयांचा तस्करी करून आणलेला माल जप्त करण्यात आला आहे.
या बांगड्या आपल्या नसून मुंबईत एकाला देण्यासाठी आपल्याकडे देण्यात आल्याचा त्यांनी दावा केला आहे.