सोन्या बैलाचा होणार दशक्रिया विधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:08 AM2021-07-24T04:08:21+5:302021-07-24T04:08:21+5:30
मंचर येथील सोन्या नावाच्या बैलाने वीस वर्षात मालकाला जिल्ह्यात नावलौकिक मिळून दिला. लाखो रुपयांची बक्षिसे मिळवली. शर्यतीच्या घाटात ...
मंचर येथील सोन्या नावाच्या बैलाने वीस वर्षात मालकाला जिल्ह्यात नावलौकिक मिळून दिला. लाखो रुपयांची बक्षिसे मिळवली. शर्यतीच्या घाटात सोन्या धावणार असे समजतात प्रेक्षकांच्या पाहण्यासाठी उड्या पडत होत्या.त्याला तब्बल 21 लाख रुपयांना विकत घेण्याची मागणी होती. सोन्या बैल वृद्धापकाळाने मरण पावल्यानंतर मंचर येथील थोरात-भकते कुटुंबाने लाडक्या बैलाचा अंत्यविधी जड अंतकरणाने करत त्याच्या स्मृती कायम रहाव्यात यासाठी घरातलगतच दफन केले. यावेळी पुणे जिल्ह्यातील अनेक बैलगाडा मालक उपस्थित होते. .
सोन्या बैल वयस्कर झाल्यानंतरही त्याची काळजी घेण्यात आली. वृद्धापकाळाने हा बैल बुधवारी मरण पावला.त्यामुळे भक्ते परिवाराला दुःख झाले.त्याच्या अंत्यविधीसाठी पुणे जिल्ह्यातील अनेक बैलगाडा मालक उपस्थित होते. बैलांच्या आठवणी जाग्या करताना लक्ष्मण थोरात म्हणाले अनेक घाटांमध्ये शर्यतीत या बैलाने व आळंदी येथील अरुण घुंडरे यांचा विज्या नावाच्या बैलाने आमचे नाव गाजवले. हा बैलगाडा उत्तर पुणे जिल्ह्यात खूप प्रसिद्ध होते. शर्यतीत नेहमी प्रथम क्रमांक मिळविला. अनेक गाडामालक व गाडा शौकीन या सोन्या नावाच्या बैलाला पहायला कुतूहुलाने येत असे.असा उंच खिलार जातीचा हा बैल अतिशय देखणा, रुबाबदार अशी या बैलाची ओळख होती.बैलगाडा शर्यत बंद झाली. तरीही त्याची जपणूक व साभांळ गणेश थोरात,बाबाजी थोरात,संकेत थोरात,आशिष थोरात,नीतीन थोरात, लक्ष्मण थोरात भक्ते,गणेश वाळुंज करत होते. तब्बल 21 लाख रुपयाना खरेदी करण्याची तयारी एका बैलगाडा मालकाने दर्शवली होती. मात्र बैलाच्या प्रेमापोटी या परिवाराने त्याला विकले नाही.सोन्या बैलाची चर्चा आजही मंचर परिसरात केली जाते.