शिशुविहार प्राथमिक शाळा एरंडवणेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:11 AM2021-09-11T04:11:35+5:302021-09-11T04:11:35+5:30
पुणे : ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था प्रशालेत सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम व ...
पुणे : ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था प्रशालेत सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम व माजी शिक्षक-विद्यार्थी मेळावा साजरा झाला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, गुणवत्तावाढ समितीच्या प्रमुख उमा जोशी उपस्थित होते. संगणक कक्षाचे उद्घाटन रवींद्र देव यांच्या हस्ते झाले. १९७२ सालापासूनचे विद्यार्थी आणि निवृत्त मुख्याध्यापक, माजी शिक्षक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. माजी विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक यांना त्यांच्या शाळेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. ५० ज्योतींचे प्रज्वलन सर्व उपस्थितांच्या हस्ते करून सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. कार्यक्रमाचे मुख्याध्यापिका शीतल इंगुळकर यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय उमेश पोंदकुले यांनी करून दिला. कार्यक्रमाचे निवेदन ज्योती पोकळे यांनी केले, तर विद्या शितोळे यांनी आभार मानले.