ध्येयवेड्या तरुणाचे भारतभर ‘सोनेरी चतुर्भुज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 02:22 AM2017-11-10T02:22:08+5:302017-11-10T02:22:11+5:30

महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणरक्षण या महत्त्वाच्या मुद्यांवर पुण्यातील प्रीतेश क्षीरसागर या युवकाने समाजात जनजागृती करण्याच्या हेतूने भारतामध्ये ‘सोनेरी चतुर्भुज’ ही सायकल मोहीम राबवली.

A 'Golden Quadrilateral' | ध्येयवेड्या तरुणाचे भारतभर ‘सोनेरी चतुर्भुज’

ध्येयवेड्या तरुणाचे भारतभर ‘सोनेरी चतुर्भुज’

Next

पुणे : महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणरक्षण या महत्त्वाच्या मुद्यांवर पुण्यातील प्रीतेश क्षीरसागर या युवकाने समाजात जनजागृती करण्याच्या हेतूने भारतामध्ये ‘सोनेरी चतुर्भुज’ ही सायकल मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये तब्बल ४० दिवसांत १२ राज्यांतून हा सायकल प्रवास पूर्ण करत सहा हजार किलोमीटरचे अंतर पूर्ण केले
आहे.
पुण्यातून सुरू झालेली ही सायकल जनजागृती फेरी चेन्नई-कोलकाता- दिल्ली-मुंबई-पुणे अशी सोनेरी चतुर्भुज झाली. या रॅलीचा समारोप गुरुवारी पुण्यातील सेनापती बापट रोड येथे करण्यात आला. प्रीतेशने ही मोहीम काही मित्रांच्या मदतीने आणि स्वखर्चाने केली
आहे.
हा उपक्रम पुण्यातील प्रीतेश क्षीरसागर या युवकाने केला आहे. १ आॅक्टोबरपासून पुण्यातील एसबी रोड येथून सायकल फेरीला सुरुवात झाली. देशात महिलांवरील अत्याचार, महिला सक्षमीकरण त्याचबरोबर वाढते प्रदूषण चिंतेचा विषय आहे. या सर्व गोष्टींना आळा कसा घालावा, यासाठी प्रत्येकजण शक्कल लढवत असतो. मात्र, पुण्यात यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाºया या धडपड्या तरुणाने फक्त चर्चांमध्ये भाग न घेता प्रत्यक्ष स्वत: रस्त्यावर उतरून समाजात जनजागृती व्हावी, यासाठी सायकल फेरी सुरू केली आहे.

या मोहिमेमध्ये सायकल फेरीचा मार्ग पुणे-कोल्हापूर - हुबळी - बेंगलोर -चित्तोर - चेन्नई - नेल्लोर -भीरमुनिपतिनंम - कोरलम -कृष्णप्रसाद (ओडिसा) - मलिपूर -कोलकता - झारखंड -औरंगाबाद (बिहार) - वाराणसी - कानपूर -आग्रा - नोइडा - दिल्ली - राजस्थान - अहमदाबाद - सुरत - मुंबई -लोणावळा - पुणे अशा जवळपास १२ राज्यांच्या महत्त्वाच्या शहरांमधून तब्बल सहा हजार किलोमीटर एवढ्या अंतराचा एकूण प्रवास केला आहे. या मोहिमेमध्ये त्याने दररोज जवळपास दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

या मोहिमेबाबत प्रीतेश क्षीरसागर म्हणाला, ‘या मोहिमेमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, त्याविरोधातील लढा, महिलांचे सक्षमीकरण या विषयांबरोबरच ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरणाचाही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये या मोहिमेचे चांगले स्वागत केले आहे. आगामी काळातही सायकल रॅलीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अशाच सोशल विषयांवर मोहिमा राबविणार आहे.’

Web Title: A 'Golden Quadrilateral'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.