Heavy Rain In Pune: भल्या मोठ्या ढगांची पुण्यावर टेहळणी; जोरदार पावसाची शक्यता
By श्रीकिशन काळे | Published: May 30, 2023 03:52 PM2023-05-30T15:52:54+5:302023-05-30T15:53:09+5:30
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे पुणेकर हैराण
पुणे : शहरात दुपारी निरभ्र आकाश आणि सायंकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे पुणेकर हैराण झाले होते. त्यांना सोमवारी पावसामुळे दिलासा मिळाला. आता आजही पावसाचा अंदाज असून, सोमवारी सर्वाधिक पावसाची नोंद चिंचवडला ४८.५ मिमी झाली. तर डुडुळगावाला ४७. ५ मिमी पाऊस झाला.
शहरातील आकाशात क्युम्यूलोनिंम्बस म्हणजेच उंचीने मोठे ढग तयार झाले आहेत. त्यामुळे आज सायंकाळी जोरदार पावसाचा अंदाज आहे. या प्रकारच्या ढगांमुळे कमी वेळेत अधिक पाऊस पडतो. तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील दोन-तीन दिवस दुपारी निरभ्र आकाश आणि सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे.
गेल्या २४ तासांतील पाऊस (मिमी)
चिंचवड : ४८.५
डुडुळगाव : ४७.५
भोर १३.५
पाषाण ८.०
नारायणगाव ६.५
शिवाजीनगर ५.०
शिरूर : १.५
कोरेगाव पार्क : १.५
आंबेगाव : १.०
वडगावशेरी : १.०
तळेगाव : ०.५
लवळे : ०.५