भविष्यात आयुर्वेदालाही येतील अच्छे दिन : बापट
By admin | Published: December 24, 2016 12:41 AM2016-12-24T00:41:30+5:302016-12-24T00:41:30+5:30
आयुर्वेदाला हजारो वर्षांची परंपरा आहे. परदेशी औषधांच्या अतिक्रमणामुळे आयुर्वेदाकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. मात्र, निष्ठा
पुणे : आयुर्वेदाला हजारो वर्षांची परंपरा आहे. परदेशी औषधांच्या अतिक्रमणामुळे आयुर्वेदाकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. मात्र, निष्ठा ठेवून कार्य करणारे वैद्य आणि केंद्र सरकारने उचललेले पाऊल यामुळे भविष्यात आयुर्वेदाला अच्छे दिन येतील, असे प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेच्या वतीने दिला जाणारा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार आयुष मंत्रालयातील आयुर्वेद सल्लागार वैद्य मनोज नेसरी यांना बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प. य. वैद्य खडीवाले, संस्थेचे अध्यक्ष स. प्र. सरदेशमुख, रणजित पुराणिक, वैद्य योगेश गोडबोले, वैद्य विवेक साने, वैद्य विनायक खडीवाले आदी उपस्थित होते.
या वेळी वैद्य अभिजित सराफ, वैद्य शंकर दासरी, वैद्य महेंद्र शिंदे, वैद्य हरीश पाटणकर, वैद्य मनोजकुमार चौधरी, वैद्य जगदीश भुतडा, वैद्य नंदकिशोर बोरसे, वैद्य ऋषीकेश म्हेत्रे, वैद्य अभिजित जोशी, वैद्य प्रिया भिडे, वैद्य भूपाल देशमुख, वैद्य अनिता खेर यांना संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)