कौतुकास्पद निर्णय; पुण्यातील ५० गणेश मंडळांचा मांडव न घालता मंदिरातच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 05:52 PM2020-08-08T17:52:40+5:302020-08-08T17:57:31+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आणि प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

Good Decision, Celebrate Ganeshotsav in the temple itself without putting up a mandap by 50 Ganesh Mandals in Pune | कौतुकास्पद निर्णय; पुण्यातील ५० गणेश मंडळांचा मांडव न घालता मंदिरातच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय

कौतुकास्पद निर्णय; पुण्यातील ५० गणेश मंडळांचा मांडव न घालता मंदिरातच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय

Next
ठळक मुद्देमंदिरातच केली जाणार श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पुण्यातील बाबू गेनू, हत्ती गणपती, छत्रपती राजाराम मंडळ यांसह कोथरूड, बिबवेवाडी आदी उपनगरांमधील जवळपास 50 गणेश मंडळांनी एकत्र येत  मांडव न घालण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरांमध्येच श्रींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. 
     कोणत्याही संकट किंवा आपत्ती काळात गणेश मंडळांनी पुढाकार घेत सामाजिक भान राखणारी भूमिका घेतली आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने साधेपणाने उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्याला गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हुतात्मा बाबुगेनू मंडळ ट्रस्ट च्या वतीने पुणे शहरातील साव॔जनिक गणेशोत्सव मंडळाच्या  पदाधिका-यांची नवसाच्या गणपती मंदिरात शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सहभागी झालेल्या गणेश मंडळाच्या वतीने रस्त्यावर मंडप न टाकता  यंदाचा गणेशोत्सव अत्यन्त  साध्या पद्धतीने मंदिरात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पुणे शहरातील 50 मंडळाच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आला .त्यानुसार या संदर्भातील ठरावाचे निवेदन परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या कडे देण्यात आली आहे.


    मंदिरामध्ये छोट्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. मंडळाचे पाच कार्यकर्ते रोजची आरती , प्रसाद , पूजा या गोष्टी करतील. भाविकांच्या दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल.मात्र भाविकांनी दर्शनासाठी गर्दी न करण्याकरिता गणेशोत्सव हा इंटरनेटचा वापर करून लाईव्ह करण्याचा देखील  मंडळांचा विचार आहे.
...….
यंदा कोरोनामुळे मंडप न टाकता मंदिरातच उत्सव साजरा केला जाणार आहे. आम्ही दरवर्षी मंडप  पडदा लावून बंद करत नाही त्यामुळे कोरोना काळात उद्या भाविक, कार्यकर्ते कुणाला जर लागण झाली तर मंडप बंद करू शकणार नाही. पण आम्ही मंदिराचे दार बंद करू शकतो. भाविकांना दर्शनासाठी सोशल डिस्टनसिंगचे रिंगण केले आहे. भाविकांनी दर्शन घेत बाहेर जाण्याची सुविधा केली  आहे- बाळासाहेब मारणे, हुतात्मा बाबू गेनू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
.....
 कोथरूड, येरवडा, बिबवेवाडी यांसह काही गणेश मंडळांनी दहा दिवस उत्सव काळातले कार्यक्रम मंडप न करता मंदिरात करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पोलीस आणि आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. तो आम्ही कमी कसा करायचा याचा विचार आम्ही केला. मंदिरातला छोटा विसर्जनाचा गणपती आम्ही मंदिरातच विसर्जन करणार आहोत. इतर गणेश मंडळांनी याचे अनुकरण करावे- श्याम मानकर, हत्ती गणपती मंडळ
...

Web Title: Good Decision, Celebrate Ganeshotsav in the temple itself without putting up a mandap by 50 Ganesh Mandals in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.