आदिवासी आश्रमशाळांतही दर्जेदार शिक्षण - आयुष प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 02:14 AM2018-05-27T02:14:16+5:302018-05-27T02:14:16+5:30

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शाळांप्रमाणे चांगले गुण मिळावेत, त्यांची गुणवत्ता वाढावी, तसेच यासाठी प्रकल्पाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. घोडेगाव प्रकल्पातील ३१ शाळांतील शंभर टक्के मुले दहावीत पास झाली पाहिजेत, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

 Good education in tribal ashramshalas - Ayush Prasad | आदिवासी आश्रमशाळांतही दर्जेदार शिक्षण - आयुष प्रसाद

आदिवासी आश्रमशाळांतही दर्जेदार शिक्षण - आयुष प्रसाद

googlenewsNext

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शाळांप्रमाणे चांगले गुण मिळावेत, त्यांची गुणवत्ता वाढावी, तसेच यासाठी प्रकल्पाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. घोडेगाव प्रकल्पातील ३१ शाळांतील शंभर टक्के मुले दहावीत पास झाली पाहिजेत, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मुलांना परीक्षा सोपी जावी, म्हणून प्रश्नपुस्तक तयार केले व हे पुस्तक सर्व मुलांना वाटले आहे. एवढेच नाही, तर टॉपर २५ मुलांचे विशेष शिबिर घेऊन ते स्वत: मुलांचा अभ्यास घेतात. आता ते १० वीच्या निकालाची वाट पाहत असून यावर्षी आश्रमशाळेचा निकाल सर्वोत्तम लागेल, असा विश्वास त्यांना आहे.

आयुष प्रसाद म्हणाले, की एकीकाडे शासन आश्रमशाळांवर भरपूर खर्च करते. जेवढा शासन खर्च करते तेवढा खर्च कोणतीही खासगी शाळा करीत नाही. आश्रमशाळांमधील शिक्षक उच्चशिक्षित आहेत. शाळांच्या इमारती चांगल्या आहेत. मुलांना सर्व शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. जेवण वेळेवर दिले जाते,. संगणकाच्या अतिउच्च दर्जाच्या लॅब आहेत. संगणक आहेत, क्रीडांगण आहे जे शाळेसाठी हवे आहे, त्या सगळ्या सुविधा असतानाही आश्रमशाळांना चांगल्या शाळेचा दर्जा मिळत नाही, त्यांचा निकाल चांगला लागत नाही. असे का होते हा विचार केला. आश्रमशाळांमध्ये गुणवत्तेवर लक्ष दिले जात नाही, असे निदर्शनास आले. कोणतीही शाळा गुणवत्तेवर गणली जाते. यासाठी घोडेगाव प्रकल्पातील ३१ आश्रमशाळांतील मुलांचे गुण वाढावेत, याकडे लक्ष देण्याचे ठरविले. आश्रमशाळांतील मुलेदेखील कमी नाहीत, हे दाखवून देण्यासाठी तीन उद्दिष्टे ठेवली. दहावीतील शंभर टक्के मुले पास झाली पाहिजेत, प्रत्येक शाळेचे सरासरी गुण दहा टक्के वाढले पाहिजेत व मागच्या वर्षी टॉपर असलेल्या मुलांमध्ये पाच टक्के वाढ झाली पाहिजे. ही तीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सराव परीक्षेमधून नापास होणारी मुले निवडली. या मुलांवर लक्ष केंद्रित केले. यासाठी मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, विषयशिक्षक यांच्या बैठका घेतल्या; तसेच सगळ््या मुलांसाठी प्रश्नपुस्तक काढले. या पुस्तकातील प्रकरणानुसार आणि परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नानुसार मुलांना समजेल, असे पुस्तक तयार करण्यात आले. हे पुस्तक आश्रमशाळांमधील सर्वोत्तम शिक्षकांनी तयार केले. तसेच त्यांनी या मुलांची वेळोवेळी भेट घेऊन अभ्यास कसा करावा, परीक्षेला कसे सामोरे जावे, गुण वाढण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले. त्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा विभागाचा दर्जा सुधारावा, याकडेही लक्ष दिले. यासाठी मुलांचा सराव करून घेतला. स्वत: मुलांचा योगा घेतला. राजपूर येथे प्रकल्पस्तरीय तर घोडेगाव येथे विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये आश्रमशाळेतील मुलांनी चांगले यश संपादन केले. यातून घोडेगाव प्रकल्पातील ३३ मुले राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवडली गेली. आदिवासी मुलांमधील गुण पाहता ही मुले क्रीडा स्पर्धेत चांगले काम करू शकतात, असा विश्वास आहे. तसेच यावर्षी दहावी, बारावीमध्ये गेलेल्या मुलांसाठी घोडेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत उन्हाळी सुटीत जादा क्लास सुरू केले आहेत. जूनपासून डिसेंबरपर्यंत वर्गामध्ये शिकविलेला अभ्यासक्रम फेब्रुवारीमध्ये होणाºया परीक्षेत विद्यार्थ्यांच्या पूर्ण लक्षात राहत नाही. अभ्यास करताना त्यांची दमछाक होते, पेपर हातात येईपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी शासकीय आश्रमशाळेतील तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांकडून अभ्यास घेतला जात आहे. या उपक्रमामुळे दुर्गम डोंगरी भागातील विद्यार्थी ख-या अर्थाने मुख्य प्रवाहात येणार आहे. यामुळे त्याला शहरी भागाप्रमाणेच पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. भविष्यात मनाचा कौल ओळखून शिक्षण तसेच मार्ग निवडता येणार असल्यामुळे त्याचा विकास होणार आहे. परंपरा आणि समूहाच्या चक्रव्यूहात न अडकता हे विद्यार्थी ख-या अर्थाने मोकळ्या आकाशात उडण्यासाठी सज्ज होतील. हा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यात सर्व ठिकाणी सुरू करण्यास प्रयत्नशील आहोत.

Web Title:  Good education in tribal ashramshalas - Ayush Prasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.