चांगली रुग्णालये ही काळाची गरज
By admin | Published: December 22, 2016 02:18 AM2016-12-22T02:18:48+5:302016-12-22T02:18:48+5:30
रुग्णसेवा हा आपल्याकडे मोठा प्रश्न आहे़ गरजू रुग्णांपर्यंत अत्याधुनिक सोयीसुविधा पोहोचणे अत्यावश्यक आहे़ चांगली रुग्णालये
पुणे : रुग्णसेवा हा आपल्याकडे मोठा प्रश्न आहे़ गरजू रुग्णांपर्यंत अत्याधुनिक सोयीसुविधा पोहोचणे अत्यावश्यक आहे़ चांगली रुग्णालये ही काळाची गरज असून, ती उभारणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले़
मुकुंद माधव फाउंडेशनच्या वतीने शिवाजीनगर येथील पोलीस हॉस्पिटलला ८० लाख रुपयांची अत्याधुनिक साधनसामग्री देण्यात आली़ परांजपे स्कीमच्या वतीने पोलीस हॉस्पिटलच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले़ त्याच्या उद्घाटनाप्रसंगी बापट बोलत होते़ पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, फिनोलेक्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश छाब्रिया, फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त रितू छाब्रिया, शंशाक परांजपे, देवयानी हॉस्पिटलचे डॉ़ श्रीरंग लिमये, संजय आयशर हे उपस्थित होते़. पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले़.
जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून या हॉस्पिटलसाठी २१ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. समाज आणि पोलीस यांच्यातील दरी रुंदावत जाणे, हे चांगल्या समाजाचे लक्षण नाही़ पोलिसांची केवळ संख्या वाढवून हा प्रश्न सुटणार नाही, तर गुणात्मक वाढही झाली पाहिजे़ त्यासाठी पोलीस शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असला पाहिजे़.
- गिरीश बापट, पालकमंत्री
शिवाजीनगर येथील या पोलीस हॉस्पिटलची अवस्था पाहून खूप दु:ख झाले होते़ त्याचे नूतनीकरण करण्याचा विचार सहकाऱ्यांशी बोलून दाखविला़ ही अत्याधुनिक उपकरणे चालविण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ नाहीत़ शासन ते देईपर्यंत हे हॉस्पिटल चालविण्याची जबाबदारी देवयानी हॉस्पिटलचे
डॉ़ श्रीरंग लिमये यांनी घेतली आहे़ या सर्वांच्या सहकार्याने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना चांगली आरोग्य सुविधा देण्याचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे़ - रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त
मनावर घेतले, तर कोणतेही काम
किती जलद होऊ शकते, याचे पोलीस हॉस्पिटल हे एक उदाहरण आहे़ तीन आठवड्यंत हे अत्याधुनिक हॉस्पिटल उभे राहिल्याचे
प्रकाश छाब्रिया
यांनी सांगितले़