नशीब बलवत्तर! कोरोना रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका दुभाजकाला धडकली, रुग्ण सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 11:18 PM2021-05-07T23:18:35+5:302021-05-07T23:22:10+5:30

सुदैवाने ८० वर्षांच्या आजी सुखरूप.....

Good luck! The ambulance carrying the corona patient for treatment hit the divider | नशीब बलवत्तर! कोरोना रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका दुभाजकाला धडकली, रुग्ण सुखरूप

नशीब बलवत्तर! कोरोना रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका दुभाजकाला धडकली, रुग्ण सुखरूप

Next

वानवडी : पुणे - सोलापूर रस्त्यावरील काळुबाई मंदिर येथील चौकात असलेल्या बीआरटी बसथांबाच्या दुभाजकाला धडकून रुग्णवाहिकेला सायंकाळी साडे सात वाजता आसपास अपघात झाला. या वाहनात ऑक्सिजनवर असलेल्या लिला कुलकर्णी (वय ८०, रा. पुर्णानगर, चिंचवड ) या महिला कोरोना रुग्णाला तातडीने दुसऱ्या रुग्णवाहिकेतून दवाखान्यात पाठण्यात आले. 

बी.एम पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर या हॉस्पिटलची आयसीयु असलेली रुग्णवाहिका ( के.ए. २८ सी २०२७) विजापूर, कर्नाकटवरुन पिंपरी येथील वाय सी एम रुग्णालयात कोरोना रुग्ण निलाबाई कुलकर्णी यांना घेऊन चालली होती. चालक राजु खेगडे (रा. कर्नाटक) सह या रुग्णवाहिकेत एकूण ४ व्यक्ती होत्या. कुलकर्णी या लग्नकार्यासाठी कर्नाटक येथे गेल्या होत्या तिथे त्रास झाल्याने कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 

काळुबाई चौकातील बीआरटीच्या दुभाजकाला धडकून रुग्णवाहीकेला अपघात झाल्याचे समजताच रतन पवार व अमित शेवकर यांनी प्रसंगावधान राहून त्वरीत दुसरी ऑक्सिजन असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. 

वानवडी वाहतूक पोलीस उपनिरीक्षक महादेव देसाई व हवालदार तिरुपती लिंगाण्णा त्याच बरोबर महिला पोलीस पल्लवी वाघचौरे व भारती गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती संभाळली.

काळुबाई मंदिर येथील चौकात बीआरटीचा बसथांबा आहे. तेथील दुभाजकाला रिफ्लेक्टर व पथदिवे नसल्याने वाहन चालकाला दुभाजकाचा अंदाज आला नाही, त्यामुळे हा अपघात झाला. याआधी सुद्धा येथे दुभाजकाला धडकून अनेक वाहनांचा अपघात झाला आहे. दुभाजक दुरुस्त करुन रिफ्लेक्टर लावण्यासंदर्भातील अर्ज प्रशासनाला देण्यात आला होता. मागील आठ दिवसापूर्वी येथील दुभाजकाची दुरुस्ती करण्यात आली होती परंतु रिफलेक्टर बसवण्यात आलेले नाही असे येथील रतन पवार यांनी सांगितले.

Web Title: Good luck! The ambulance carrying the corona patient for treatment hit the divider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.