आनंदाची बातमी..! ससूनमध्ये आयसीयूत उपचार घेतलेले ५ रुग्ण GBS मुक्त; डिस्चार्जही मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:51 IST2025-02-03T11:51:11+5:302025-02-03T11:51:52+5:30

ससूनमधील जीबीएसबाधित पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Good news 5 patients treated in ICU in Sassoon are free from GBS; discharged. | आनंदाची बातमी..! ससूनमध्ये आयसीयूत उपचार घेतलेले ५ रुग्ण GBS मुक्त; डिस्चार्जही मिळाला

आनंदाची बातमी..! ससूनमध्ये आयसीयूत उपचार घेतलेले ५ रुग्ण GBS मुक्त; डिस्चार्जही मिळाला

पुणे - पुण्यात १५८ संशयित रुग्णांची जीबीएसबाधित म्हणून नोंद पुणे, दि. ३१ - गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांमध्ये वाढ होत असून, रविवारी नव्याने नऊ रुग्ण आढळले. आतापर्यंत पुण्यात १५८ संशयित रुग्णांची जीबीएसबाधित म्हणून नोंद करण्यात आली आहे. तर ससूनमधील जीबीएसबाधित पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णसंख्या १५८ वर पोहोचली आहे. त्यामध्ये ३१ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील, तर ८३ रुग्ण समाविष्ट गावातील आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील १८, ग्रामीणमधील १८ तर इतर जिल्ह्यातील ८ रुग्णांचा समावेश आहे. त्यातील २१ रुग्ण व्हेंटीलेटरवर असून, ४८ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. बाधित रुग्णसंख्येत २० ते २९ वयोगटातील सर्वाधिक ३५ तर ० ते ९ वयोगटातील २३ आणि ५० ते ५९ वयोगटातील २५ रुग्णांचा समावेश आहे.
 

ससूनमधील पाच रुग्णांनी केली जीबीएसवर मात...
पुण्यातून गुईलेन बॅरी सिंड्रोमबाबत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. ससूनमधील पाच जीबीएसबाधित रुग्णांनी आजारावर यशस्वी मात केली. डॉक्टरांनी या रुग्णांना पुष्पगुच्छ, पेढे भरून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळाले. पुण्यात आतापर्यंत १५८ जीबीएस बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन संशयित रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे. यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

डिस्चार्ज मिळालेल्या पाच रुग्णांवर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, अधीक्षक डॉ. यलप्पा जाधव, डॉ. रोहिदास बोरसे, डॉ. एच. बी. प्रसाद, डॉ. सोनाली साळवी, डॉ. हर्षल भितकर, डॉ. संजय मुंढे, डॉ. धनंजय ओगले, डॉ. नागनाथ रेडेवाड, डॉ. नेहा सूर्यवंशी यांच्या टीमने यशस्वी उपचार केले.

वयोमानानुसार रुग्णसंख्या

वय एकूण रुग्णसंख्या

० ते ९ २३

१० ते १९ २२


२० ते २९ ३५

३० ते ३९ १८

४० ते ४९ १६

५० ते ५९ २५

६० ते ६९ १४

७० ते ७९ २

८० ते ८९ ३

Web Title: Good news 5 patients treated in ICU in Sassoon are free from GBS; discharged.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.