यंदा विदर्भासाठी गुड न्यूज; शंभर टक्के पाऊस होणार, राज्यात सरासरी ९५ टक्के

By श्रीकिशन काळे | Published: June 2, 2023 03:18 PM2023-06-02T15:18:16+5:302023-06-02T15:19:26+5:30

महाराष्ट्रातील हवेच्या दाबामध्ये सतत बदल हाेत असल्याने १० जूनपर्यंत मॉन्सून दाखल होणार

Good news for Vidarbha this year Hundred percent rainfall will occur average 95 percent in the state | यंदा विदर्भासाठी गुड न्यूज; शंभर टक्के पाऊस होणार, राज्यात सरासरी ९५ टक्के

यंदा विदर्भासाठी गुड न्यूज; शंभर टक्के पाऊस होणार, राज्यात सरासरी ९५ टक्के

googlenewsNext

पुणे: यंदा महाराष्ट्रात सरासरी ९५ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. जून-जुलै महिन्यात कमी पाऊस होईल आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात साधारण पाऊस पडेल.  कमी दिवसांत अधिक पावसाचेही प्रमाण वाढणार आहे. विदर्भात मात्र गुड न्यूज असून, तिथे शंभर टक्के पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी)ने ९६ टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. डॉ. साबळे गेली २० वर्षांपासून पावसाचा अंदाज देत आहेत. ते म्हणाले,‘‘मी माझे स्वत:चे एक मॉडेल तयार केले आहे. त्यामध्ये स्थानिक पातळीवरील हवामानानूसार अंदाज देतो. त्यामुळे ते बरोबर ठरतात. यंदा कमी पाऊस पडणार आहे. वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, जळगाव, राहुरी, कराड, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही (चंद्रपूर) या ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडेल. तर दापोली, पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, निफाड, सोलापूर व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहणार आहे. हवामान बदलामुळे पावसावरही परिणाम होत आहे. जागतिक तापमान वाढत असल्याने समुद्रातील तापमानावरही फरक पडत आहे. येत्या २०३० पर्यंत तापमानात २ अंशाने वाढ होणार आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसेल.’’

शेतकऱ्यांनी अशी पिके घ्यावीत

पाऊस कमी असल्याने शेतकऱ्यांनी कमी पावसात येणारी पिके घेतली पाहिजेत. जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये. अन्यथा शेतकऱ्यांचेच नुकसान होते. कमी कालावधीत येणारे मूग, मटकी, चवळी, घेवडा अशी पिके घ्यावीत. तर कमी पाऊस पडल्यानंतर हरबरा, करडई हे रब्बी हंगामात घेता येतील. पावसाप्रमाणे शेतकऱ्यांनी देखील पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील हवेच्या दाबामध्ये सतत बदल हाेत आहे. येत्या १० जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. केरळमध्ये तो दाखल झाल्यावर सतत चार दिवस पाऊस पडला तर त्याची पुढील वाटचाल चांगली राहील. - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ

राज्यातील पावसाचा अंदाज

विभाग               सरासरी      अंदाज      टक्केवारी
पुणे                    ५६६            ५३२          ९४
अकोला               ६८३            ६३५          ९३
नागपूर                ९५८            ९५८         १००
यवतमाळ            ८८२             ८८२        १००
शिंदेवाही चंद्रपूर   ११९१           ११९१         १००
परभणी               ८१५            ७४८          ९३
दापोली              ३३३९           ३१३८         ९४
धुळे                   ४८१            ४४७          ९३
जळगाव             ६४०            ५९४          ९३
कोल्हापूर           ७०६             ६७०         ९५
कराड               ५७०             ५३०          ९३
सोलापूर             ५४३            ५०४           ९३
राहुरी                 ४०६           ३७७           ९३

Web Title: Good news for Vidarbha this year Hundred percent rainfall will occur average 95 percent in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.