आनंदवार्ता! पुणे शहरात सोमवारच्या कोरोनाबाधितांची संख्या शंभरच्या आत, केवळ ८६ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 09:08 PM2021-09-20T21:08:50+5:302021-09-21T01:29:55+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ११ संशयितांची तपासणी करण्यात आली
पुणे : पुणे शहरात सोमवारी सप्टेंबर महिन्यातले सगळ्यात कमी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. केवळ ८६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ११ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.४३ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या आजमितीला १ हजार ५७१ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही १७३ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ४ लाख ८८ हजार ८८४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ४ जणांचा मृत्यू झाला आहे.