कोकणवासियांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी पुणे विभागाच्या ११८ जादा एसटी बसेस; सर्वाधिक गाड्या कोकणात धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 07:00 PM2021-08-30T19:00:39+5:302021-08-30T19:01:37+5:30
यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.
पुणे: गणेशोत्सवसाठी राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागाच्या ११८ अतिरिक्त एसटी धावणार आहेत. यात सर्वधिक गाड्या कोकणात जातील. आतापर्यंत जवळपास ६० गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. येत्या काही दिवसात आणखी काही गाड्यांचे आरक्षण होईल, असा अंदाज एसटी प्रशासनाला आहे. उर्वरित गाड्या पुणे-मुंबई, पुणे-कोल्हापूर, पुणे -सातारा या मार्गावर सोडण्यात येणार आहे. कोकणसाठी ८ सप्टेंबर पासून अतिरिक्त गाड्या सुटणार आहे.
मागच्या वर्षी गणेशोत्सवर कोरोनाचे सावट होते.त्यामुळे एसटी प्रवासासह अन्य बाबीवर निर्बंध होते. यंदाच्या वर्षी मात्र दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मुंबई ,पुणे सह अन्य विभागातून गणेशोत्सवसाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी प्रशासनाने केले आहे. यात पुणे विभागाचा देखील समावेश आहे. सर्वधिक गाड्या कोकणातील रत्नागिरी,चिपळूण, सिंधुदुर्ग , लांजा, आदी मार्गावर सोडण्यात येणार आहे.
ज्यांचे दोन लस झाले त्यांना आरटी पीसीआर ची गरज नाही
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवसाठी कोकणात येणाऱ्या भक्तासाठी काही प्रमाणात निर्बंध लावले आहे. त्यानुसार ज्या नागरिकांचे लसीचे दोन डोस झाले आहे.त्यांना प्रवेशसाठी आरटीपीसीआर ची गरज नाही. मात्र ज्यांचे एक डोस झाला अथवा एकही झाला नाही अशाना मात्र ७२ तास आधी आरटीपीसीआर टेस्ट करून त्याचा निगेटिव्ह अहवाल असेल तरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. एसटी ने प्रवास करणाऱ्या देखील हा नियम लागू आहे.त्यामुळे एसटी प्रशासनाने दिलेल्या नियमांचा पालन करावे असे आवाहन केले आहे.
गणेशोत्सवसाठी अतिरिक्त गाड्यांचे पुणे विभागाने नियोजन केले आहे. गरजेनुसार यात वाढ देखील केली जाईल. प्रवशांनी विशेषतः कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी कोविड च्या नियमांचे पालन करावे.
- ज्ञानेश्वर रनवरे ,विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, पुणे विभाग.