महामेट्रोकडून पुणेकरांना गोड बातमी! सायकल बरोबर घेऊन करता येणार मेट्रोने प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 07:47 PM2021-03-09T19:47:17+5:302021-03-09T19:49:14+5:30

मेट्रो सुरू होण्यासाठी आता पुणेकरांना फारच थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे...

Good news for Pune citizens from Mahametro! You can travel by metro by bicycle | महामेट्रोकडून पुणेकरांना गोड बातमी! सायकल बरोबर घेऊन करता येणार मेट्रोने प्रवास 

महामेट्रोकडून पुणेकरांना गोड बातमी! सायकल बरोबर घेऊन करता येणार मेट्रोने प्रवास 

Next
ठळक मुद्देसायकलप्रेमींसाठी शुल्क आकारणीही नाही

पुणे: शहरातील सायकलप्रेमींसाठी खास आनंदवार्ता आहे. मेट्रोचा प्रवास सायकलप्रेमींना आता आपली सायकलबरोबर घेऊनही करता येईल. सायकलींचे शहर ही जुनी ओळख व सायकलचे महत्व लक्षात घेऊन महामेट्रोने हा निर्णय घेतला आहे.

नागपूरमध्ये याआधीच महामेट्रो कंपनीने हा निर्णय घेतला. नागपूरकर सायकलप्रेमींनी या निर्णयाला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे तोच निर्णय पुण्यातही घेण्यात आला आहे अशी माहिती महामेट्रोचे जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी ही माहिती दिली.

यातून मेट्रोच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांना काहीही अडचण येणार नाही. स्थानकात येण्या- जाण्यासाठी लिफ्ट, जिने अशा व्यवस्था आहे. त्यामुळे सायकल घेऊन थेट फलाटावर येता येईल. डब्यातील आतील जागाही सायकल घेऊन उभे राहता येईल अशी आहे. मेट्रो सुरू होण्यासाठी आता पुणेकरांना फारच थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे असे सोनवणे यांनी सांगितले.

महामेट्रोने सुरूवातीपासून पर्यावरणाला महत्व दिले आहे. काही हजार वृक्षांची लागवड हे त्याचेच उदाहरण आहे. विजेच्या वापरासाठी सौर उर्जा, स्थानकांमध्ये पाण्याचे रिसायकलींग ही त्याचीच उदाहरणे आहेत. सायकल घेऊन प्रवास हा त्याचाच एक भाग आहे. पुणेकर सायकलप्रेमी आता मेट्रोने आपली सायकल घेऊन प्रवास करू शकतील व इच्छित स्थळी जाऊन तिथे सायकलचा वापर करून आपली कामे करू शकतील.
डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो

Web Title: Good news for Pune citizens from Mahametro! You can travel by metro by bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.