रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : पहाटेची डेमू धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:42 AM2018-06-10T01:42:32+5:302018-06-10T01:42:32+5:30
पुणे-दौंड रेल्वे प्रवाशांसाठी एक गोड बातमी आहे. ११ जून रोजी सकाळी दौंडहून पुण्याकडे जाण्यास पहिली दौंड-पुणे डेमू लोकल (७१४०७) पहाटे ५.४० वाजता धावणार आहे.
केडगाव : पुणे-दौंड रेल्वे प्रवाशांसाठी एक गोड बातमी आहे. ११ जून रोजी सकाळी दौंडहून पुण्याकडे जाण्यास पहिली दौंड-पुणे डेमू लोकल (७१४०७) पहाटे ५.४० वाजता धावणार आहे. तसेच, रात्री ३.१५ ला पुण्याहून-दौंडकडे डेमू (७१४०८) या दोन लोकल धावणार आहेत.
दौंडवरून पुण्याकडे धावणारी लोकल मधल्या सर्व स्थानकांवर थांबेल, तर पुण्यावरून दौंडकडे जाणारी लोकल फक्त लोणी काळभोर, उरुळी कांचन व केडगाव या तीन स्थानकांवर थांबणार आहे. ही लोकल प्रायोगिक स्वरुपात तीन महिन्यांसाठी करण्यात येणार आहे. यशस्वी झाल्यास कायम
करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
यापूर्वी २००४ पर्यंत दौंड - पुणे रेल्वेमार्गवर पहाटे दौंड रेल्वेस्थानकावरून ४.४० वाजता दौंड-पुणे शटल सोडण्यात येत होती. परंतु ती काही कारणास्तव रेल्वे प्रशासनाने बंद केली. तब्बल १४ वर्षांनंतर प्रवाशांच्या आग्रहास्तव रेल्वेमार्गावर ही डेमू लोकल चालू होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणारी प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यात येणार आहे.
पाटस ते हडपसरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. यासाठी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा, वरिष्ठ मार्गदर्शक जयप्रकाश अग्रवाल, वरिष्ठ राजेंद्र शहा व सचिव दिलीप होळकर यांनी २ मे २०१८ रोजी सोलापूर डिव्हिजनच्या अधिकाºयांना मागणी केली होती. या पथकाने अधिकाºयांना पहाटे धावणाºया सोलापूर व मनमाड पॅसेंजर या गाड्या दररोज उशिरापर्यंत धावत आहेत. यामुळे पुण्याकडे जाणाºया चाकरमानी, नोकरदार, विद्यार्थी, दूधवाले, भाजीविक्रेते यांचे हाल होत आहेत. परिणामी दररोज गाड्या उशिरा असल्याने हजारो प्रवासी पुणे-सोलापूर महामार्गाने मिळेल त्या वाहनाने प्रवास करून पुण्याला जातात, ही बाब निदर्शनास आणली होती.
‘लोकमत’नेही प्रवाशांच्या पहाटेच्या होणाºया गैरसोयीबद्दल वारंवार आवाज उठवला होता. अखेर रेल्वे प्रशासनाने पुणे मंडल व सोलापूर मंडल यांच्या सहकार्याने सकाळी ५.४० वाजता दौंडहून पुण्याकडे दौड-पुणे डेमू लोकलचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. रेल्वे प्रवासी ग्रुपने वारंवार रेल्वे प्रशासनास केलेल्या पाठपुराव्यात यश आले. यामुळे पाटस ते हडपसरदरम्यान प्रवास करणाºया हजारो प्रवांशाना मोठा दिलासा मिळणार आहे.
ही डेमू लोकल तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी दौंडकडे रवाना होईल. यामध्ये लोणी उरुळी व केडगाव
या तीन रेल्वेस्थानकावर थांबा
देण्यात येणार आहे व ही डेमू
लोकल पहाटे पाच वाजेपर्यंत
दौंड स्थानकावर पोहोचणार आहे व नंतर ही डेमू लोकल दौंड रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे ५.४० वाजता रवाना केली जाईल.
डेमूच्या स्वागतासाठी प्रवासी सज्ज
४ही डेमू निघताना दौंड येथे प्रस्थान कार्यक्रम आहे. मार्गावरील पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी, हडपसर येथे हजारो प्रवासी स्वागताचा कार्यक्रम घेणार असल्याचे केडगाव प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पोपट चव्हाण यांनी सांगितले.