चांगल्या लाेकांनी राजकारणात यायला हवे : गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 09:42 PM2018-07-23T21:42:47+5:302018-07-23T21:43:33+5:30
चांगल्या लाेकांची राजकारणात गरज असून चांगल्या लाेकांनी राजकारणात यायला हवे असे मत गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
पुणे : चांगल्या लाेकांची राजकारणात गरज असून चांगल्या लाेकांनी राजकीय जीवनात यायला हवे असे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. लाेकमतच्या विश्वकर्मा : द ड्रीम बिल्डर्स काॅफीटेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बाेलत हाेते.
नॅशनल क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांना उद्देशून बापट म्हणाले, सतीश मगर कधी जॅकेट घालत नाहीत,परंतु अाज ते जॅकेट घालून अाले अाहेत, त्यामुळे त्यांचा राजकारणात यायचा विचार अाहे की काय अशी शंका येत अाहे. सर्व क्षेत्रातील चांगल्या लाेकांनी राजकीय जीवनात येणे अावश्यक अाहे. लाेकमतबाबत बाेलताना ते म्हणाले, लाेकमत सकाळी वाचला की सर्व माहिती मिळते. त्यामुळे काेणीही कुठल्याही विषयावरील प्रश्न विचारला तरी त्याला उत्तर देता येते. काही वृत्तपत्रांनी स्वतःवर विशिष्ट ठपका लावून घेतला अाहे. परंतु लाेकमतने समजातील सगळ्याच गाेष्टींची दखल घेऊन पक्षविरहीत बातम्या देण्याचे काम केले अाहे.
लाेकमत एडिटाेरिअल बाेर्डाचे चेअरमन विजय दर्डा म्हणाले, जसे मुख्यमंत्री कुठलाही भेदभाव करत नाहीत त्याचप्रमाणे पुणेकरही कुठलाही भेदभाव न करता लाेकमतवर भरभरुन प्रेम करतात. देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवक ते मुख्यमंत्री असा यशस्वी प्रवास केला अाहे. जसे लाेकमत कुठल्याही पक्षाचे नाही तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाएेवजी राज्याचे प्रमुख म्हणून काम करत अाहात. विदर्भावरील अन्याय दूर करण्याचे काम फडणवीस करत अाहेत. मुख्यमंत्री, नितीन गडकरी यांनी प्रत्येक भागाला न्याय देण्याचे काम केले अाहे. अाम्हाला मुख्यमंत्र्यांचा अभिमान अाहे.