वेल्ह्यात बांबू प्रशिक्षणास महिलांचा चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:09 AM2021-01-18T04:09:46+5:302021-01-18T04:09:46+5:30
वस्तू महिलांनी यावेळी बनविल्या आहेत. वेल्हे येथील पंचायत समितीमधील सर्वशिक्षा अभियान सभागृहात महाराष्ट्र ग्रामीण जिवन्नोती विभाग व ग्रामीण स्वयंरोजगार ...
वस्तू महिलांनी यावेळी बनविल्या आहेत.
वेल्हे येथील पंचायत समितीमधील सर्वशिक्षा अभियान सभागृहात महाराष्ट्र ग्रामीण जिवन्नोती विभाग व ग्रामीण
स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था रुडसेट तळेगाव दाभाडे यांच्या सयुक्त विद्यमाने बाबु प्रशिक्षणाचे आयोजन
करण्यात आले होते. बांबूपासून आकाश कंदील, टेबलावर मोबाइल स्टॅन्ड, प्लावर पॉट, चहा ट्रे, वॉल पीस
आदी. वस्तू महिलांनी यावेळी बनविल्या आहेत. तालुक्यात बांबूचे उत्पादन जास्त असल्याने महिलांना एक चांगला
व्यवसाय या प्रशिक्षणामुळे मिळणार आहे. या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरी भागातील महिला
उपस्थित होत्या. बांबू असोशिएनचे अध्यक्ष हेमंत बेडकर यांनी सांगितले. येथील महिलांसोबत आम्ही काम करत
राहणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे.
महमंद संधी, बांबू प्रशिक्षक सागर पवार, जयंत घोगडे, संदीप पाटील व तालुक्यातील महिला उपस्थित होत्या.
पंचायत समिती (ता.वेल्हे) बांबू प्रशिक्षणदरम्यान महिला बांबूपासून वस्तू बनविताना.