सुखद वार्ता! यंदा चांगला पाऊस पडणार; दक्षिण आशियाई हवामान आऊटलुक फोरमचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 07:46 PM2021-04-28T19:46:01+5:302021-04-28T19:50:46+5:30

दक्षिण आशियात मान्सून दरम्यान पावसाची स्थिती कशी असेल, याचा आढावा ९ आशियाई देशातील तज्ञ घेत असतात.

GoodNews! There will be good rains in South Asia this year; Guess of the South Asian Weather Outlook Forum | सुखद वार्ता! यंदा चांगला पाऊस पडणार; दक्षिण आशियाई हवामान आऊटलुक फोरमचा अंदाज 

सुखद वार्ता! यंदा चांगला पाऊस पडणार; दक्षिण आशियाई हवामान आऊटलुक फोरमचा अंदाज 

googlenewsNext
ठळक मुद्देजून ते सप्टेंबरमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता

पुणे : हवामान विभागाने यंदा मान्सून सर्वसाधारण ९७ ते १०४ टक्के पडणार असल्याची सुखद वार्ता नुकतीच दिल्यानंतर आता दक्षिण आशियाई हवामान आऊटलुक फोरमनेही दक्षिण आशियात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तरेकडील काही भागात सामान्यापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

दक्षिण आशियात मान्सून दरम्यान पावसाची स्थिती कशी असेल, याचा आढावा ९ आशियाई देशातील तज्ञ घेत असतात. त्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका, भुतान, मालदीव आणि म्यानमान या देशांचा समावेश आहे.  यंदा ही परिषद २६ ते २८ एप्रिल दरम्यान ऑनलाईन झाली. या परिषदेत तज्ञांनी यंदा दक्षिण आशियात सर्वसाधारण पाऊसमान असेल, असा अंदाज व्यक्त केला. 

पश्चिम भारत, हिमालयाच्या पायथ्याशी आणि पूर्व, पूर्व भाग मध्य भारतातील अनेक भागात यंदा पाऊस सर्वाधिक असेल. वायव्य, ईशान्य भागातील बर्‍याच भागात सामान्यापेक्षा पाऊस कमी असण्याची शक्यता आहे.

जून ते सप्टेंबर या हंगामात किमान तापमान हे सरासरीच्या तुलनेत अधिक असण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील पश्चिम, वायव्य, उत्तर आणि उत्तरे पूर्वकडील भागामध्ये किमान तापमान सामान्यपेक्षा कमी असेल. या काळात ला निनो हा तटस्थ राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज परिषदेत व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: GoodNews! There will be good rains in South Asia this year; Guess of the South Asian Weather Outlook Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.