Pune : तळेगावात विदेशी मद्यासह १ कोटीचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 01:52 PM2022-11-24T13:52:26+5:302022-11-24T13:52:46+5:30
तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत कारवाई केली. यात ८७ लाख ८९ हजार ५२० रुपये किमतीच्या गोव्यात तयार झालेल्या विदेशी मद्यासह एकूण १ कोटी ५ लाख ७ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर, हॉटेल शांताई समोर रोडवर सापळा रचून मद्याचा साठा घेऊन जाणारा ट्रक जप्त करून ही कारवाई केली. या ट्रकमध्ये रिअल व्हिस्की ७५० मिलीचे ४ हजार १६४ सीलबंद बाटल्या व रिअल व्हिस्की १८० मिलीचे ५ हजार ७६० सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की ७५० मिलीचे ९ हजार ६०० सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकूण १ हजार २६७ खोके जप्त केले.
मद्य आणि वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ५ लक्ष ७ हजार ५२० रुपये आहे. वाहनचालक प्रवीण परमेश्वर पवार (वय २४, रा. तांबोळे, ता. मोहोळ) व देविदास विकास भोसले (वय २९, रा. खवणी, मोहोळ, जि. सोलापूर) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चरणसिंह राजपूत यांनी दिली.