दीड वर्षांपासून फरार होता शेवाळे टोळीचा गुंड, कोंढवा पोलिसांनी 'असा' पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 08:28 PM2023-02-15T20:28:18+5:302023-02-15T20:44:29+5:30

उरुळी देवाची परिसरात असणाऱ्या शेवाळे टोळीचा तो टोळीप्रमुख

Goon of Shewale gang was absconding for one and a half years Kondhwa police caught 'Asa' | दीड वर्षांपासून फरार होता शेवाळे टोळीचा गुंड, कोंढवा पोलिसांनी 'असा' पकडला

दीड वर्षांपासून फरार होता शेवाळे टोळीचा गुंड, कोंढवा पोलिसांनी 'असा' पकडला

googlenewsNext

पुणे/किरण शिंदे: मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यात मागील दीड वर्षापासून फरार असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी अखेर जेरबंद केले. वृषभ रामदास शेवाळे (वय 24) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. उरुळी देवाची परिसरात असणाऱ्या शेवाळे टोळीचा तो टोळीप्रमुख आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शेवाळे टोळीने उरुळी कांचन परिसरात 2021 मध्ये दहशत माजवली होती. या टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तत्कालीन पोलीस आयुक्तांनी संपूर्ण टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली होती. पोलिसांच्या या कारवाईनंतर तो फरार झाला होता.

दरम्यान कोंढवा पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी त्याचा शोध घेत होते. दरम्यान त्याचा शोध सुरू असतानाच पोलीस हवालदार निलेश देसाई आणि पोलीस नाईक ज्योतिबा पवार यांना तो अहमदनगर जिल्ह्यातील चांदा या गावी राहत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार कोंडवा पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील यांच्यासह कर्मचारी निलेश देसाई, सतीश चव्हाण, गोरखनाथ चिंके आणि ज्योतिबा पवार यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास चांदा गावात जाऊन रात्रीच्या वेळीस गाढ झोपेत असताना त्याला अटक केली.

Web Title: Goon of Shewale gang was absconding for one and a half years Kondhwa police caught 'Asa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.