रिक्षाला धडक दिल्याचा जाब विचारल्याने गुंडाने रोखले पिस्तूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:11 AM2021-09-23T04:11:25+5:302021-09-23T04:11:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोल पंपावर रिक्षामध्ये पेट्रोल भरत असताना दोघे गुंड मोटारसायकलवरून आले़ रिक्षाला धडक दिल्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पेट्रोल पंपावर रिक्षामध्ये पेट्रोल भरत असताना दोघे गुंड मोटारसायकलवरून आले़ रिक्षाला धडक दिल्याचा जाब विचारल्यावरून गुंडाने आपल्याकडील पिस्तूल काढून रिक्षाचालकाच्या छातीवर धरून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. कोंढवे धावडे येथील धावडे पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला.
याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी संदीप मोहन सावंत (वय २६) आणि स्वरुप संगपाल आवटे (वय १९, दोघे रा. उत्तमनगर) यांना अटक केली आहे.
याप्रकरणी समीर संजय घुमे (वय २८, रा. कुडजे गाव) यांनी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
संदीप सावंत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खून तसेच खुनाचा प्रयत्न केल्याचे २ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध ७-८ गुन्हे दाखल असून उत्तमनगर परिसरात तो दहशत माजवत असतो. धावडे पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री साडेआठ वाजता समीर घुमे हे रिक्षामध्ये पेट्रोल भरत होते. त्यावेळी संदीप सावंत व स्वरुप आवटे हे मोटारसायकलवरून आले. त्यांनी रिक्षाला धडक दिली. त्याचा घुमे यांनी जाब विचारल्यावर संदीप याने सरळ आपल्याकडील पिस्तूल काढून घुमे यांच्या छातीला लावले. त्यामुळे घाबरून घुमे हे उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या दिशेने पळत जाऊ लागले. तेव्हा त्यांचा पाठलाग करून जिवे मारण्याच्या हेतूने त्यांच्यावर पिस्तूल रोखले. तेथे जमलेल्या लोकांना शिवीगाळ करून दहशत माजवली. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करीत आहेत.