Pune Crime | जामिनावर बाहेर आलेल्या गुंडाचा गुंडांनीच काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 12:50 IST2023-02-25T12:46:21+5:302023-02-25T12:50:03+5:30
याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा...

Pune Crime | जामिनावर बाहेर आलेल्या गुंडाचा गुंडांनीच काढला काटा
पुणे : पूर्ववैमनस्यातून मोक्कातील गुन्हेगार नंदू जाधव (वय २२, रा. लक्ष्मीनगर) याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. ही घटना कर्वेनगरमध्ये रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नाेंदवला आहे.
अधिक माहितीनुसार, नंदू जाधव याच्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात मोक्काखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला नुकताच जामीन मिळाल्याने तो बाहेर आला होता; नंदू जाधव हा गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गांधी भवन येथील पीएनजी ज्वेलर्स येथून जात असताना त्याला गुंडांनी गाठले. त्याच्या डोक्यात धारदार शस्त्रांनी वार केले. त्यात तो जबर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यात खुनाचे कलम वाढविले. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. अलंकार पोलिस अधिक तपास करीत आहेत.