‘आया मेरा भाई आया’ म्हणत गुंड कसबेची येरवड्यात रॅली; 'माय किंग बॅक' रिल्स व्हायरल

By नितीश गोवंडे | Updated: January 9, 2025 23:30 IST2025-01-09T21:14:48+5:302025-01-09T23:30:49+5:30

तो बाहेर येताच त्याने व त्याच्या समर्थकांनी काढलेली रॅली सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र

Goons in Yerwada town chanting 'Aaya Mera Bhai Aaya'; Reels of My King Back go viral on social media | ‘आया मेरा भाई आया’ म्हणत गुंड कसबेची येरवड्यात रॅली; 'माय किंग बॅक' रिल्स व्हायरल

‘आया मेरा भाई आया’ म्हणत गुंड कसबेची येरवड्यात रॅली; 'माय किंग बॅक' रिल्स व्हायरल

पुणे - येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड आणि दहशत माजवल्याप्रकरणी प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे टोळीवर मोक्काची कारवाई केली होती. गुड्या कसबे मंगळवारी (दि. ७) सायंकाळी येरवडा कारागृहातून बाहेर आला. तो बाहेर येताच त्याने व त्याच्या समर्थकांनी काढलेली रॅली सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र त्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेली रॅली दहशत पसरवणारी असल्याने त्याला आणि त्याच्या समर्थकांना चांगलीच महागात पडली आहे. याप्रकरणी आता येरवडा पोलिस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील आणि तुषार पेठे यांच्यासह ३५ ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई लहू गडमवाड यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रफुल्ल कसबे हा मंगळवारी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास त्याच्या समर्थकांनी त्यांच्याकडील चारचाकी गाड्या व २० ते ३० दुचाकींवरून रॅली काढली. ही रॅली विनापरवानगी काढून यावेळी गाड्या बेदरकारपणाने चालवत आरडा-ओरडा व घोषणाबाजी करून परिसरात दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर कसबे याच्यासह सुमारे ५० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजन चौक परिसरात हा गुंड प्रफुल्ल कसबे हा जामिनावर बाहेर आल्यानंतर जल्लोष करण्यात आला होता.

समर्थनार्थ काढलेली रॅली उलटली 
चार वर्षापूर्वी तळोजा कारागृहातून बाहेर पडलेल्या गुंड गजा मारणे याच्या रॅलीनंतर शहरातील गुन्हेगारी ढवळून निघाली होती. त्यानंतरच शहरात टोळ्यांवर मोक्काचे सत्र सुरू झाले होते. त्यानंतर सुमारे २४० टोळ्यांवर मागील चार वर्षांत मोक्का अंतर्गत कारवाई झाली. त्यापैकी एका मोक्काच्या कारवाईत कारागृहात असलेला प्रफुल्ल कसबे जामिनावर सुटला. मात्र त्याच्या समर्थनार्थ काढलेली रॅली ही त्याच्यावर उलटली आहे. पोलिसांनी याप्रकरणात त्याला करण्याची तजवीज देखील ठेवली आहे.

Web Title: Goons in Yerwada town chanting 'Aaya Mera Bhai Aaya'; Reels of My King Back go viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.