कोलकत्यावरून गर्भवती महिलेसाठी 'प्लाझ्मा'ची डिमांड; पुण्यातील 'वंदे मातरम संघटने'ची १५ मिनिटांत कमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 06:23 PM2021-04-22T18:23:56+5:302021-04-22T20:46:25+5:30
पंधरा मिनिटांत उपलब्ध झाला प्लाझा
पुणे: कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत कोलकात्यामधील गर्भवती महिलेला ए निगेटिव्ह प्लाझाची गरज असते. त्यांचा वंदे मातरम संघटनेला फोन येतो. तात्काळ संघटनेत हालचाल सुरू होते. सोशल मीडियाची ताकद आणि संपर्क यावर संघटना १५ मिनिटांत प्लाझ्मा मिळवून देते. यावर कोलकात्यामधील महिलेच्या नातेवाईकांनी संघटनेचे आभार मानले आहेत.
कोलकात्याला एक गर्भवती महिला कोरोनाशी झुंज देत आहे. त्यांना प्लाझाची गरज भासू लागते. अशा परिस्थितीत कोणाकडून प्लाझा मागवता येईल असे प्रश्न उभे राहतात. कोणतरी त्यांना वंदे मातरम संघटनेचा नंबर देते. संघटनेतील वैभव वाघ यांना फोन येतो. आणि गर्भवती महिलेसाठी ए निगेटिव्ह प्लाझ्माची मागणी केली जाते. वैभव वाघ संघटनेच्या माध्यमातून सोशल मीडिया आणि जनसंपर्काच्या मदतीने प्लाझासाठी खटपट करू लागतात. अशा परिस्थितीत १५ मिनिटांत प्लाझा उपलब्ध होतो. कोरोनाच्या वेगापेक्षा माणुसकी व्हायरल होण्याचे हा अनुभव आहे. असे वैभव वाघ यांनी सांगितले.