सरकारचा दृष्टिकोन शिक्षक, शेतकरीविरोधी : बेनके
By admin | Published: March 27, 2017 02:10 AM2017-03-27T02:10:29+5:302017-03-27T02:10:29+5:30
महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण भागातील शिक्षक व शेतकरी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा शिक्षक व शेतकऱ्यांच्या, तसेच
ओतूर : महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण भागातील शिक्षक व शेतकरी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा शिक्षक व शेतकऱ्यांच्या, तसेच ग्रामीण भागातील बँका, सहकारी संस्था यांच्या विरोधात आहे, असे मत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी ओतूर येथे व्यक्त केले.
ओतूर-पिंपरी पेंढार जि. प. गटाचे नवनिर्वाचित सदस्य मोहित सुदाम ढमाले यांनी या गटातील जि. प. प्राथमिक शाळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षक मेळावा आयोजित केला होता. या शिक्षक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार होते.
या मेळाव्यासाठी तालुका गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ, जि.प. सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, मोहित ढमाले, पं.स. सदस्य विशाल तांबे, रंजना काळे, जालिंदर पानसरे, शिक्षणविस्तार अधिकारी सुनंदा डुंबरे, केंद्रप्रमुख डी. डी. भांगे, प्रा. शिक्षक संघटना पुणे जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे, राज्य सल्लागार संजय डुंबरे, तालुकाध्यक्ष उपेंद्र डुंबरे उपस्थित होते.
प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून समस्या आढावा मेळाव्याचे उद्घाटन केले. शिक्षक बदलीला घाबरतो; परंतु त्यांना दिलासा देणारा निर्णय झाला आहे. त्या शिक्षकांकडे वाहने नाही. रस्ते नाहीत या समस्यांचा सहानुभूतीने विचार करू, असे अध्यक्ष पांडुरंग पवार म्हणाले. (वार्ताहर)
शासनाने शिक्षकांसाठी जो जी.आर. काढला आहे; त्यामुळे शिक्षक हवालदिल झाला आहे. हा जाचक निर्णय समानीकरणाच्या बदल्या, आदिवासी भागात काम करणाऱ्या एकस्तर वेतनश्रेणी ३१ मार्चपूर्वी द्यावी. कोल्हेवाडी येथील शिक्षकांना जे विनावेतन केले आहे, त्यांच्या सेवापुस्तकातील लाल शेरा काढावा. जि.प. येणारे शैक्षणिक साहित्य येणे ते दर्जेदार असावे, अशा मागण्याही केल्या. मोहित ढमाले व विशाल तांबे यांनी या गटातील प्राथमिक शाळांच्या मागण्या इमारती व शैक्षणिक साहित्य गुणवत्ता यांची माहिती संकलित केली.
- खंडेराव ढोबळे,
सरचिटणीस, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना