फुले वाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:09 AM2021-01-04T04:09:46+5:302021-01-04T04:09:46+5:30
पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी फुले वाडा येथे सावित्रीबाई फुले ...
पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी फुले वाडा येथे सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने फुले वाड्याचा विकास करण्यासाठी आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.
सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे दरवाजे उघडून दिले, सर्वसामान्य जनतेला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, त्यांच्यामुळे महिला सक्षम झाल्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, असे धनंजय मुंडे यांनी या वेळी सांगितले.
कार्यक्रमास समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त आयुक्त दिलीप डोके, सहआयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त संगीता डावकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरघंटीवार, सहायक आयुक्त उदय लोकापली उपस्थित होते.