सरकार सकारात्मक धोरण राबविण्यात अपयशी : धस
By admin | Published: February 20, 2017 01:55 AM2017-02-20T01:55:25+5:302017-02-20T01:55:25+5:30
शासनदरबारी बाणाचे आणि ‘कमळा’चे पटत नसल्याने हे सरकार सकारात्मक धोरणे राबविण्यात सपशेल अपयशी ठरत आहे
शेलपिंपळगाव : शासनदरबारी बाणाचे आणि ‘कमळा’चे पटत नसल्याने हे सरकार सकारात्मक धोरणे राबविण्यात सपशेल अपयशी ठरत आहे. रुसूबाईची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने राजीनाम्याच्या पोकळ धमक्या देण्याऐवजी खिशातले राजीनामे राज्यपालांकडे सुपूर्त करण्याचे धाडस दाखवावे. गुंडांना सर्व्हिस देणारे नरेंद्र आणि देवेंद्रचे शासन शेतकरीविरोधात असल्याची खणखणीत टीका माजी महसूलमंत्री सुरेश धस यांनी केली. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव-रेटवडी गटातील व गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ कनेरसर (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत धस बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शैलेश मोहिते, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, सभापती नवनाथ होले, निर्मलाताई पानसरे, वैशाली गव्हाणे, बिजली भालेकर, विलास कातोरे, सयाजीराजे मोहिते, धैर्यशील पानसरे, शरद मोहिते आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)