Pune: इतिहास विकण्याचा नवा धंदा सरकारने सुरु केलाय; वारसास्थळ दत्तक योजनेबाबत सुप्रिया सुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 07:07 PM2024-08-14T19:07:14+5:302024-08-14T19:08:11+5:30

सरकारी मालकीचे उद्योग विकूनही सरकारचे मन भरले नाही, म्हणून आपली परंपरा आणि इतिहास विकण्याचा हा नवा धंदा सरकारने सुरु केला

Government has started a new business of selling history Supriya Sule criticism of the Warsawsthal adoption scheme | Pune: इतिहास विकण्याचा नवा धंदा सरकारने सुरु केलाय; वारसास्थळ दत्तक योजनेबाबत सुप्रिया सुळेंची टीका

Pune: इतिहास विकण्याचा नवा धंदा सरकारने सुरु केलाय; वारसास्थळ दत्तक योजनेबाबत सुप्रिया सुळेंची टीका

पुणे: केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी “ऍडॉप्ट अ हेरिटेज” ही खास योजना तयार करण्यात आली आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांबाबत तयार केलेल्या नव्या योजनेत पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसास्थळे दत्तक घेता येणार आहेत.

शनिवार वाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी, कार्ला-भाजे लेणी आणि लोहगड या पाच प्राचीन स्थळांचं संवर्धन करण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने निवड केली आहे. त्यामुळे आता या पाचही स्थळं दत्तक घेता येणार आहे. या निर्णयाबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या 'वारसास्थळ दत्तक' योजनेअंतर्गत पुण्यातील शनिवार वाड्यासह, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी आदी प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. त्याबाबत सुळे यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त करत ट्विट केले असून सरकारकडे ही वारसास्थळे जतन करण्यासाठी पैसा नसावा, यासारखे दुर्दैव नाही, असा खेद व्यक्त केला आहे.

देशातील प्राचीन व ऐतिहासिक वारसास्थळे खासगी संस्था व कंपन्यांना दत्तक देण्याच्या गोंडस नावाखाली केंद्र सरकारने ही स्थळे भाडेतत्वावर देण्याचा घाट घातला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड- किल्ले, तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण देणारी व जागतिक वारसा असणारी लेणी, मंदिरे, वाडे आदी सर्व वारसा स्थळे या निर्णयामुळे खासगी क्षेत्राला आंदण दिली जाणार आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

सरकारी मालकीचे उद्योग विकूनही सरकारचे मन भरले नाही म्हणून आपली परंपरा आणि इतिहास विकण्याचा हा नवा धंदा सरकारने सुरु केला. ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे.आम्ही याचा निषेध करीत असून शासनाने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, असे सुळे यांनी पुढे नमूद केले आहे.

Web Title: Government has started a new business of selling history Supriya Sule criticism of the Warsawsthal adoption scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.