सरकारी अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:15 AM2021-05-05T04:15:36+5:302021-05-05T04:15:36+5:30
अन्न आणि औषध प्रशासन असे एकच खाते असले तरी दोन्ही गोष्टींसाठी स्वतंत्र अधिकारी आहेत. पुणे विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संपर्क ...
अन्न आणि औषध प्रशासन असे एकच खाते असले तरी दोन्ही गोष्टींसाठी स्वतंत्र अधिकारी आहेत. पुणे विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधला असता त्यांनी राज्य संकेतस्थळावर माहिती असते, असे सांगितले. ते काम कोणाकडे असे विचारल्यावर त्यांचा नंबर दिला. त्यावर १० वेळा फोन करून मेसेज पाठवले तर एकदाही रिप्लाय आला नाही. त्यांचे सहकारी असलेल्यांना फोन केला तर त्यांनीही उचलला नाही.
---///
सरकारला रक्तपेढ्यांची किंमत नाही
प्रशासन आणि पुढारी दोघांनाही रक्तपेढ्यांची किंमत नाही. रक्तपेढीला काही स्टाफ अत्यावश्यक असतो. सर्व रक्त उणे तापमानात ठेवावे लागते. तंत्रज्ञ ठेवावेच लागतात. सरकार कशातही काहीही मदत करत नाही. आणि सगळे रक्तदानाचे आवाहन करत फिरतात. स्वतः मात्र कधीच करत नाहीत. शहरातील रक्तसाठ्याची एकत्रित माहिती उपलब्ध करून देणे तंत्रज्ञानाने कितीतरी सोपे आहे, पण कोणालाच त्याविषयी आस्था नाही.
शांतिलाल सुरतवाला, माजी महापौर, रक्तदान चळवळीतील ज्येष्ठ पदाधिकारी
---//
रक्तपेढीकडून मिळालेले रक्तपिशवी आणि प्लाझ्माचे दर
रक्तपिशवी: १५०० ते १८०० रुपये
साधा प्लाझ्मा- ५०० रुपये
कोरोनामुक्त रुग्णाचा प्लाझ्मा: ५,५०० रुपये