शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार निष्क्रिय

By admin | Published: May 20, 2016 02:19 AM2016-05-20T02:19:55+5:302016-05-20T02:19:55+5:30

राज्यातील जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे

Government on the issue of farmers' inactive | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार निष्क्रिय

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार निष्क्रिय

Next


शिरूर : राज्यातील जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सगळीकडे भीषण दुष्काळ पडला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. भाजपा-शिवसेना सरकारला उच्च न्यायालय यांना सांगावे लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, हे सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप शिरूरचे माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी केला.
शिरूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले नाही, तर शिरूर तहसीलदार कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा इशारा या वेळी त्यांनी दिला.
या वेळी सरकारचा निषेध म्हणून रस्त्यांवर कांदा व दूध टाकून भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी केले.
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, मंचर बाजार समिती चेअरमन देवदत्त निकम, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे
जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पंचायत समिती सभापती सिद्धार्थ कदम, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रविबापू काळे, युवकचे
तालुकाध्यक्ष कुंडलिक शितोळे, शहराध्यक्ष जाकीर खान पठाण, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे, बाळासाहेब नरके, घोडगंगा कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब फराटे, शेखर पाचुंदकर, शिक्षण मंडळ माजी सभापती नीलेश खाबीया, खरेदी-विक्री चेअरमन बाळासाहेब नागवडे, उपसभापती मंगलाताई लंघे, राजेंद्र गावडे, सोमनाथ भुजबळ, दत्ता हरगुडे, शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष वर्षाताई शिवले, संतोष रणदिवे, बाबासाहेब भोर, शैलेश घाडगे, सुधीर फराटे, जयवंत सालुंके, विकास लवांडे, दिलीप मोकाशी, सुधीर फराटे, जगन्नाथ पाचर्णे, पोपट दसगुडे, सुभाष कळसकर, विक्रम वर्पे, विलास कर्डिले उपस्थितीत होते.
शिरूर-न्हावरे फाटा येथे पुणे-नगर रस्त्यावर दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. या वेळी भाजपा-शिवसेना सरकारचा निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. वोडाफोनला दोन हजार कोटींची सूट देणारे सरकार शेतकऱ्यांच्या कांदा, दूधदराच्या बाबतीत मूग गिळून गप्प का? असा सवाल करून, शेतकरी आत्महत्या करीत आहे. परंतु या सरकारला त्याचे देणे-घेणे नाही, असे मत अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
काळेधन आणणारे सरकार प्रत्येक नागरिकांच्या खात्यात पैसे टाकणारे व अच्छे दिन आणणारे सरकार गेले कुठे, कांद्याला बाजारभाव नाही, दुधाला बाजारभाव नाही, कर्जमाफी करणारे सरकार कुठे गेले, वीजमाफी सोडा, परंतु वीजबिलात अकरा टक्के वाढ केली आहे, ही दरवाढ शेतकरी यांनी भरू नये, कोणी अधिकारी बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शण तोडत असतील, तर युवक कॉँग्रेस त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासेल.
- मानसिंग पाचुंदकर, पुणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस

Web Title: Government on the issue of farmers' inactive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.