शासकीय यंत्रणा-व्यावसायिक यांच्यात होणार कुरघोड्या ?

By admin | Published: March 3, 2016 01:35 AM2016-03-03T01:35:01+5:302016-03-03T01:35:01+5:30

तहसीलदारांच्या वाहनचालकाच्या अपघाती मृत्यूमुळे अनेक कायदेशीर व बेकायदेशीर प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. शासकीय यंत्रणा विरुद्ध व्यावसायिक

Government machinery-professionals will be going to slaughter? | शासकीय यंत्रणा-व्यावसायिक यांच्यात होणार कुरघोड्या ?

शासकीय यंत्रणा-व्यावसायिक यांच्यात होणार कुरघोड्या ?

Next

इंदापूर : तहसीलदारांच्या वाहनचालकाच्या अपघाती मृत्यूमुळे अनेक कायदेशीर व बेकायदेशीर प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. शासकीय यंत्रणा विरुद्ध व्यावसायिक यांच्यात कुरघोड्या होण्याची शक्यता बळावली आहे. या दोन्ही बाजूंचा निपक्षपाती तपास होणे गरजेचे बनले आहे. उजनी धरण व नीरा-भीमा नद्यांचे खोरे, पाणलोट क्षेत्र हा इंदापूर तालुक्यातील सर्व भाग ‘काळ्या सोन्याची खाण’ मानला जातो.
शासनाला महसूल व व्यवसायिकांना वाळू हवी आहे. अन् या दोन्ही गरजेच्या सांधीमधला शासकीय प्रवृत्तीला मधला ‘मलिदा’ हवा आहे. एकीकडे मलिदा ही खायचा आणि दुसरीकडे कारवाईही सहन करायची, या तोंड दाबून बुक्क्या मारण्याच्या प्रकाराचा ज्या वेळी कडेलोट झाला. त्या वेळी निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंदळकर यांच्या नेतृत्वाखाली वाळू व्यावसायिक एकत्र झाले. फेब्रुवारी महिन्याच्या आठ तारखेला पुणे व सोलापूर जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाह्यवळण रस्त्याच्या डोंगराई ढाब्यानजीक तब्बल दीड तासांचा रास्ता रोको केला. तहसील कार्यालयात हंगामा केला. या गोष्टीला सतरा दिवस उलटल्यानंतर गुरुवारी (दि. २५) तहसीलदारांचा शासकीय वाहनचालक अनिल जयसिंग काळे (वय ५५, रा. पाटील बंगला परिसर, इंदापूर) यांचा डोंगराई ढाबा सर्कलजवळ अपघाती मृत्यू झाला.
त्यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सचिन पांडुरंग माने, नवनाथ किसन एकाड (दोघे रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर) यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल केला. तहसीलदार सूर्यकांत येरले यांना गुन्हा नोंदवतेवेळी धमकी देऊन शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या कारणावरून, दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ एकाडचा भाऊ शिवाजी एकाड यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. तिघेही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
याबाबत सखोल चौकशी करताना, काही बाबीही प्रकाशात आल्या आहेत. काळे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीमध्ये आरोपींनी फोन करून काळे यांना बोलावून घेतले. सचिन माने या आरोपीने काळे यांच्या दुचाकीला ठोस दिली, असा उल्लेख केला आहे. मुळात काळे यांना त्या दिवशी सुट्टी नव्हती, ते नोकरीवर असताना, त्यांनी दुचाकीवरून येणे चुकीचे आहे. जर, आरोपींनी फोन केला व ते निर्धास्तपणे आरोपींकडे आले. याचा अर्थ त्यांचे आधीपासूनचे लागेबांधे असणार आहेत. आरोपींना त्यांना जिवे मारायचे असते, तर त्यांनी स्वत:चे वाहन वापरलेच नसते. परहस्ते ते असे कृत्य करू शकले असते.

Web Title: Government machinery-professionals will be going to slaughter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.