शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:10 AM2021-09-19T04:10:31+5:302021-09-19T04:10:31+5:30
२० खाटांची क्षमता: साडेपाच कोटींचा खर्च, उच्च दर्जाची सेवा मिळणार बारामती: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कॅपजेमिनी कंपनीच्या वतीने ...
२० खाटांची क्षमता: साडेपाच कोटींचा खर्च, उच्च दर्जाची सेवा मिळणार
बारामती: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कॅपजेमिनी कंपनीच्या वतीने २० खाटांच्या क्षमतेच्या अतिदक्षता विभागाचे लोकार्पण शुक्रवारी (दि. १७) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कॅपजेमिनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्डी, एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट प्रसाद शेट्ये, व्हाईस प्रेसिडेंट जगदीश कांचन, सीएसआर हेड कुमार अनुराग प्रताप, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, अधिष्ठाता डॉ. चंद्रशेखर म्हस्के, डॉ. संतोष भोसले, नीलेश नलावडे, डॉ. मनोज खोमणे, डॉ. सदानंद काळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवा अधिक उच्च दर्जाची करण्याच्या उद्देशाने कॅपजेमिनी कंपनीने आपल्या सीएसआरमधून पुणे जिल्ह्यातील बारामती येथे २० खाटांच्या क्षमतेचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. यासाठी जवळपास साडेपाच कोटी रुपयांचा खर्च आला आहे. बारामती व पंचक्रोशीतील रुग्णांना उच्च दर्जाची सेवा मिळावी, त्यांचे प्राण वाचावेत यासाठी सीएसआरच्या माध्यमातून बारामतीकरांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याचे कंपनीच्या वतीने नमूद करण्यात आले. लवकरच बारामतीचे शासकीय सर्वोपचार रुग्णालय कार्यान्वित होईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. चंद्रशेखर म्हस्के यांनी प्रास्ताविकात दिली.
------------------
१ हाजर लिटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट...
शासकीय सर्वोपचार रुग्णालयात एक हजार लिटर प्रतिमिनिट क्षमतेच्या पीएसए ऑक्सिजन प्लांटची निर्मिती याठिकाणी करण्यात आली आहे. यामुळे बारामतीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत विविध ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली आहे.
----------------------------
वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागाच्या लोकार्पण प्रसंगी शरद पवार, अश्विन यार्डी व इतर.
१८०९२०२१-बारामती-०४