सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:28 AM2020-12-15T04:28:14+5:302020-12-15T04:28:14+5:30
संभाजी ब्रिगेड : एसईबीसीचे आरक्षण कायद्याने टिकणार नाही पुणे : मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून दिलेल्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. ...
संभाजी ब्रिगेड : एसईबीसीचे आरक्षण कायद्याने टिकणार नाही
पुणे : मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून दिलेल्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. एसईबीसीचे आरक्षण कायद्याने टिकणार नाही. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे. आम्ही अशी भूमिका १९९० पासून मांडत आहोत. पण सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालेच पाहिजे. महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी प्रदेश संघटक संतोष शिंदे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते उपस्थित होते.
आखरे म्हणाले,
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोगाने राज्य आणि केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. मात्र राजकीय इच्छाशक्ती नसल्याने मराठा समाजाला आरक्षणापासून उपेक्षित ठेवले जात आहे. त्यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन आणि इतर प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच मराठा समाजाची एक पिढी बरबाद होत आहे. हे सरकारला दिसत नाही. केंद्र सरकारने मागासवर्ग आयोगाच्या शिफारसी स्वीकारव्यात. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे.