सरकारी कार्यालयाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:07+5:302020-12-27T04:08:07+5:30

बारामतीतील १२ शासकिय कार्यलयावर सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार ९३६ किलोवॅट विज निर्मिती बारामती : विजेची वाढती मागणी पाहता ...

Of government office | सरकारी कार्यालयाच्या

सरकारी कार्यालयाच्या

Next

बारामतीतील १२ शासकिय कार्यलयावर

सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार

९३६ किलोवॅट विज निर्मिती

बारामती : विजेची वाढती मागणी पाहता अपारंपारिक ऊर्जा स्तोत्राचा विकास करणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या सौर ऊर्जा स्तोत्राचा वापर करून बारामतीतील १२ शासकीय कार्यालयाच्या छतावर ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे वीज बिलापोटी खर्च होणाऱ्या लाखो रुपयांची बचत होणार आहे.

बारामती शहर आणि तालुक्यातील बारा शासकीय कार्यालयांच्या छतावर सौर पॅनल बसवण्यात येणार आहेत. यामध्ये न्यायालय, ग्रामीण, महिला, उपजिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) पारेषण सलग्न सौर विद्युत संच बसविणार आहे. बारा कार्यालयांसाठी त्यांच्या छतावर हा संच कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या उपलब्ध टेरेसपैकी सावली विरहित क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक कार्यालयाच्या मंजूर वीज वापर क्षमतेनुसार व रोहीत्राच्या क्षमतेच्या ७० टक्के भार ग्राह्य धरला जातो. त्यामुळे या प्रकल्पाची ९३६ किलो वॅट क्षमता आहे, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली. प्रशासकीय भवन, कृषी भवन, अभियांत्रिकी भवन, अशा अकरा प्रशासकीय इमारती मिळून २,२७,७५९ स्क्वेअर फुट टेरेस उपलब्ध आहे.

--

कार्यालयनिहाय सौर प्रकल्प व क्षमता (किलो वॅट)

प्रशासकीय भवन- २८

अभियांत्रिकी भवन- १९

कृषि भवन-९

न्यायालय इमारत- ५९

आरटीओ(उपप्रादेशिक परिवहन) - ३९

ग्रामीण रुई हॉस्पिटल - २४

उपजिल्हा रुग्णालय सिल्व्हर जुबिली - ६७

विश्रामगृह बारामती - २३

विश्रामगृह मोरगाव - ३

महिला हॉस्पिटल - ८९

मेडिकल कॉलेज- ४९०

ऊर्जा भवन - ८६

सौरउर्जा स्त्रोत प्रकल्पामुळे वीज बिलामध्ये बचत होईल. बचतीचा पैसा प्रशासकीय व जनहितासाठी उपयोगी पडणार आहे.

- सुनील पावडे

मुख्य अभियंता महावितरण बारामती परिमंडल

-------

Web Title: Of government office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.