शहरात आणखी ८६ लसीकरण केंद्रांना शासनाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:46+5:302021-04-07T04:11:46+5:30
पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच पुणे महापालिकेने लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत़ ...
पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच पुणे महापालिकेने लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत़ त्यास यश येत असून, केंद्र शासनाने महापालिकेने पाठविलेल्या २१० लसीकरण केंद्राच्या प्रस्तावांपैकी ८६ लसीकरण केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे़
शहरात दररोज एक लाख लसीकरण करण्याबाबतचे ध्येय ठेवण्यात आल्याने, अधिकाधिक केंद्रांची निर्मिती करून, तेथे इंटरनेट, लॅपटॉप आदी पायाभुत सुिवधा अािण प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्याचे आव्हान सध्या पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे़
शहरातील राज्य शासनाच्या औंध व ससून रूग्णालय धरून सध्याच्या ११९ लसीकरण केंद्राव्दारे लसीकरण करण्यात येत आहे़ सोमवारी एका दिवशी शहरात २१ हजार ८६ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे़ तसेच शहरात आत्तापर्यंत ४ लाख ३९ हजार ६०७ लस देण्यात आल्या असून, यापैकी ४७ हजार २७६ जणांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत़
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन लसीकरण केंद्र सुरू करताना त्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत आहे़ त्यानुसार दोन दिवसांपूर्वी खाजगी रूग्णालयांमध्ये नवीन २१० लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता़ यापैकी ८६ नवीन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे.
दरमयान लसीकरणासाठी येणाºया नागरिकांची संख्या एप्रिलपासून मोठ््या प्रमाणात असलयाने, लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये़ याकरिता पुणे महापालिकेने स्वत:च्या लसीकरण केंद्राजवळील शाळांमध्ये प्रतिक्षा कक्ष तसेच निरिक्षण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ सध्या २२ लसीकरण केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे़
-------------------------------------