घरेलू कामगार मंडळासाठी सरकार सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:15 AM2021-08-17T04:15:20+5:302021-08-17T04:15:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : घरेलू कामगार कल्याण मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच ...

Government positive for domestic workers board | घरेलू कामगार मंडळासाठी सरकार सकारात्मक

घरेलू कामगार मंडळासाठी सरकार सकारात्मक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : घरेलू कामगार कल्याण मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच या अनुषंगाने केलेल्या जिल्हा दौऱ्याचा अहवाल देणार आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

डॉ. गेाऱ्हे म्हणाल्या, राज्यातील घरेलू कामगार महिलांची अवस्था बिकट आहे. त्यांच्या व एकूणच असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांचा दौरा केला. त्यावेळी ही बाब प्रकर्षाने जाणवली. कोरोना निर्बंधात सरकारने त्यांना मदत केली; पण त्याशिवाय त्यांना आणखी मोठा मदतीचा कायमस्वरूपी हात मिळायला हवा. घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून ही गरज भागवणे शक्य आहे.

त्यादृष्टीने कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर चर्चा झाली आहे, अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. मुश्रीफ त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य घेत आहेत. मंडळाचे कामकाज सध्या फक्त कामगार आयुक्त कार्यालयात घरेलू कामगार महिलांची नोंद करून घेण्याइतके मर्यादित झाले आहे. या नोंदीही संबधितांना जिल्हा दौऱ्यात आदेश दिल्याने सुरू झाल्या आहेत. मंडळ कार्यान्वित झाले तर घर कामगार महिलांसाठी अधिक चांगल्या योजना राबवणे शक्य होईल. त्यामुळेच याबाबत लवकरच मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन याविषयी बोलणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी ‘लोकमत’बरोबर बोलताना सांगितले.

Web Title: Government positive for domestic workers board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.