सासवडला शासनमान्य नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षण केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:58+5:302021-03-04T04:20:58+5:30

यावेळी आयुर्वेद शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बहिरट, अष्टांग कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राशी सल्गन पुण्यातील अष्टांग कौशल्य विकास ...

Government-run Nursing Assistant Training Center started at Saswad | सासवडला शासनमान्य नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षण केंद्र सुरू

सासवडला शासनमान्य नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षण केंद्र सुरू

Next

यावेळी आयुर्वेद शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बहिरट, अष्टांग कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राशी सल्गन पुण्यातील अष्टांग कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे सल्लागार प्रकाश भोंगे, दळवी फौंडेशनचे अध्यक्ष डाॅ. राजेश दळवी, माजी नगराध्यक्ष हेमंत भोंगळे, डाॅ. दीपक जगताप, डाॅ. वृषाली जगताप, डाॅ. सुभाषचंद्र अग्रवाल, बंडूकाका जगताप, सुनीलकाका जगताप, चंदुकाका जगताप, सुधीर हेंद्रे, सासवड कौशल्य विकासच्या संचालिका मंजूषा दळवी, प्रशिक्षक नूतन गोसावी, राजश्री शिवरकर, कुमुदिनी पांढरे, बाळासाहेब भिंताडे आदी उपस्थित होते.

सुनील बहिरट म्हणाले, कोरोनामुळे वैद्यकीय वा आरोग्य क्षेत्रात मनुष्यबळाची खरी गरज समजली. ही गरज भागविण्यासाठी व शासनमान्य कौशल्य विकास प्रमाणपत्राद्वारे नर्सिंग असिस्टंट पदासाठी कुशल मनुष्यबळ सासवडसारख्या ग्रामीण स्तरावर विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात पॅरामेडिकलमधील पंचकर्म असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, बेडसासाईड असिस्टंट हे ही कोर्स उपलब्ध केले जातील. जेणेकरून ग्रामीण भागात स्थानिक स्तरावर रोजगार वा स्वंयरोजगार निर्मिती होईल.

डाॅ. राजेश दळवी यांनी प्रास्ताविक केले. स्वागत मंजूषा दळवी यांनी केले. सूत्रसंचालन बंडूकाका जगताप यांनी केले.

Web Title: Government-run Nursing Assistant Training Center started at Saswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.